जळगाव – जळगाव तालुक्यातील कुसुबा ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत प्रमोद गंगाधर घुगे यांची बिनविरोध निवड झाली. ग्रामपंचायतीच्या सभागृहात झालेल्या विशेष बैठकीत सरपंच व सदस्यांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडली.
उपसरपंच पदासाठी केवळ प्रमोद गंगाधर घुगे यांचे एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. यावेळी ग्रामसेवक, पंचायत समितीचे अधिकारी, स्थानिक नागरिक आणि ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. त्यांच्या या निवडीमुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
निवडीनंतर प्रमोद घुगे यांनी ग्रामपंचायतीच्या विकासकामांना गती देण्याचा निर्धार व्यक्त केला. “ग्रामस्थांच्या विश्वासाला पात्र ठरून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहीन,” असे ते म्हणाले.
या निवडीबद्दल त्यांचे विविध स्तरांतून अभिनंदन करण्यात आले. ग्रामस्थांनी त्यांच्याकडून प्रभावी नेतृत्व आणि विकासाभिमुख कार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.


