जळगाव – विठ्ठल पेठ येथील कामावर गेलेली व्यक्ती अचानक बेपत्ता झाल्याची घटना बुधवारी घडली. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली.
खेमचंद रूपचंद नेमाडे (वय-५६ रा. विठ्ठल पेठ) असे बेपत्ता झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. खेमचंद नेमाडे हे शहरातील जागृती टेन्ट हाऊस येथे कामाला आहेत. नेहमीप्रमाणे ११ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी कामावर गेले. दुपारी २ वाजता कामानिमित्त बाहेर गेले. सायंकाळी घरी आले नाही.
रात्री उशीरापर्यंत त्यांचा नातेवाईकांकडे शोधाशोध केली. मुलगा दर्शन खेमचंद नेमाडे यांच्या खबरीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली. पुढील तपास पो.ना. अमोल विसपूते करीत आहे.