Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन खान्देशचे भूषण : खा. स्मिताताई वाघ

अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

by Divya Jalgaon Team
December 1, 2024
in कृषी विषयी, जळगाव
0
ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन खान्देशचे भूषण : खा. स्मिताताई वाघ

जळगाव – ॲग्रोवर्ल्डने मागील काही वर्षांपासून प्रदर्शनात सातत्य ठेवल्यामुळेच आज या प्रदर्शनाला शेतकऱ्यांचा विक्रमी प्रतिसाद मिळाला आहे. प्रदर्शनात असलेले वैविध्यपूर्ण स्टॉल देखील त्याची ग्वाही आहेत. त्यामुळेच ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन हे खान्देशचे भूषण ठरले आहे. उद्या (सोमवारी) प्रदर्शनाचा समारोप होत असल्याने उर्वरित शेतकऱ्यांनी आवर्जून प्रदर्शनाला भेट देऊन कृषी तंत्रज्ञानाची माहिती घ्यावी, असे आवाहन खासदार स्मिताताई वाघ यांनी केले

शहरातील एकलव्य क्रीडा संकुल मैदानावर हे प्रदर्शन सुरू असून उद्या (सोमवारी) त्याचा समारोप आहे. जळगाव जिल्ह्यातील उत्कृष्ट कार्य केलेल्या महिला शेतकरी, फार्मर्स प्रोडूसर कंपनी यांचा खासदार स्मिताताई वाघ यांच्या हस्ते ॲग्रोवर्ल्ड कृषी गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. त्याप्रसंगी खासदार वाघ बोलत होत्या. डॉक्टर गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉक्टर केतकीताई पाटील जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मधुकर पाटील, आत्माचे माजी प्रकल्प उपसंचालक अनिल भोकरे, ॲग्रोवनचे संस्थापक शैलेंद्र चव्हाण यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. पुरस्कार प्राप्त महिला शेतकऱ्यांचे अभिनंदन करताना डॉ. केतकी पाटील यांनी सांगितले की घर सांभाळून कृषी क्षेत्रात, कृषी प्रक्रिया उद्योगात काम करणे ही तारेवरची कसरत आहे. मात्र हाच नारीशक्तीचा खरा जागर असून पुढे देखील महिलांनी हा संयम व चिकाटी कायम ठेवून काम करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केल्या.

तीन दिवसात हजारो शेतकर्‍यांनी दिल्या भेटी
अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनास पहिल्या तीनच दिवसात हजारो शेतकर्‍यांनी भेटी दिल्या. प्रदर्शनात शेतमजूर समस्येवर पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात आला आहे. फवारणीसाठीचे ड्रोन, प्राण्यांपासून पिकांचे सरंक्षण करणारे झटका मशीन, सोलर वरील शेती वीज पंपाचा डेमो, छोट्या व मध्यम शेतकऱ्यांना उपयुक्त ठरतील असे कृषी यंत्र यासांरखे वैशिष्ठ्यपूर्ण व अत्याधुनिक कृषी उपकरणांचे स्टॉल उपलब्ध आहेत. दरम्यान, प्रदर्शनाचा उद्या (सोमवार, दि. 2) समारोप आहे. कृषी यंत्र व अवजारांचे 40 तर एकूण 200 हून अधिक स्टॉल्स असलेल्या या आधुनिक तंत्रज्ञानाने उपयुक्त ठरणार्‍या प्रदर्शनाचा शेतकर्‍यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक शैलेंद्र चव्हाण यांनी केले आहे. जळगाव जिल्ह्यासह धुळे, छत्रपती संभाजीनगर, बुलडाणा, अकोला, बर्‍हाणपूर आदी जिल्ह्यातूनही शेतकरी आले होते.

जैन इरिगेशन सिस्टिम लिमीटेड, नमो बायो प्लांट्स या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक असून प्लॅन्टो कृषीतंत्र, श्रीराम ठिबक, निर्मल सिड्स, ओम गायत्री नर्सरी हे सहप्रायोजक आहेत.

Share post
Tags: #Agroworld Agricultural Exhibition#agroworld shailandra chavhan#jalgaon krushi pradarshni#smitatai wagh#कृषी प्रदर्शन
Previous Post

आयुष्याला प्रेरणा देण्याचे काम काव्य-साहित्य करीत असतात : उद्योजक अशोकभाऊ जैन

Next Post

बहिणाई स्मृती संग्रहालय येथे बहिणाबाई चौधरी यांच्या ७३व्या पुण्यतिथी

Next Post
बहिणाई स्मृती संग्रहालय येथे बहिणाबाई चौधरी यांच्या ७३व्या पुण्यतिथी

बहिणाई स्मृती संग्रहालय येथे बहिणाबाई चौधरी यांच्या ७३व्या पुण्यतिथी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group