जळगाव – सध्या भाजप नेते किरीट सोमय्या व शिवसेनेच्या नेत्यांमध्ये जोरदार टीकास्त्र चालू आहे. या पार्श्वभूमिवर, आज राज्याचे पाणी पुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या डोक्यावर परिणाम झाला असून त्यांनी ठाण्यातील रूग्णालयात उपचार घ्यावेत.
पाटील म्हणाले की, सोमय्या यांच्या डोक्यावर परिणाम झाला असून त्यांच्यावर ठाण्यातील रूग्णालयात उपचार करण्याची गरज आहे. तेथे शॉक दिल्यास सोमय्या ठिकाणावर येतील. ते उध्दव ठाकरे यांच्या पायाशी बसून खासदार झाले असून आता ते काहीही बरळत आहेत.
त्यांनी आधी आपली औकात पहावी आणि नंतरच वक्तव्य करावे असा खोचक सल्ला देखील ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी दिला. तर सोमय्या यांच्या सारख्या एहसान फरामोश माणसाने उध्दव ठाकरे यांच्यावर टीका करू नये असा इशारा देखील ना. पाटील यांनी दिला.