जळगाव – धरणगाव शहरातील शीख बांधवांनी गुरुनानक जयंतीच्या पावन पर्वाचे औचित्य साधून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात नुकताच प्रवेश केला.
याप्रसंगी शीख बांधवांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, आजपर्यंत आम्ही आमच्या व्यथा अनेक लोकप्रतिनिधींना सांगितल्या, परंतु कोणीही त्याबाबत गांभीर्याने विचार केला नाही. आम्हाला विश्वास आहे की माजी मंत्री श्री देवकर आप्पा निवडून आल्यानंतर नक्कीच आमच्या समस्या सोडवतील व आमचा सर्वांगिण विकास करतील.
याप्रसंगी अजयसिंग टाक, विजयसिंग टाक, लालसिंग टाक, भजनसिंग सिकलकर, कन्हैय्यासिंग टाक, हिरासिंग टाक, बिरुसिंग सिकलकर, विक्रमसिंग सिकलकर, कर्तारसिंग जुन्नी आदी शीख बांधवांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. या प्रवेश सोहळ्याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे धरणगाव शहराध्यक्ष लक्ष्मण पाटील सर, गोपाल पाटील, भगवान शिंदे, अविनाश करोसिया, संजू चंडाले, जुनेद बागवान, विलास वाघमारे, बबलू चव्हाण, चेतन पाटील, भैय्या भालेराव, सम्राट धनगर, हिरामण जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.