जळगाव- भारताचे पहिले पंतप्रधान स्व. पंडीत जवाहरलाल नेहरुजी यांच्या जीवनावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले आहे. हे व्याख्यान आज दुपारी २ वाजता काँगेस भवन येथे होणार आहे.
जळगांव शहर काँग्रेसचे निरिक्षक प्रदीपराव पवार व प्रिंसिपल भारंबे सर हे स्व. नेहरुजींच्या जीवनावर प्रकाशझोत टाकणार आहेत. तसेच त्यानंतर पक्ष संघटनात्मक विषयावर विचार विनिमय होणार आहे. या कार्यक्रमास जिल्हा अध्यक्ष अॅड. भैयासाहेब संदीपजी सुरेश पाटील , प्रदेश उपाध्यक्ष उल्हास पाटील , प्रदेश सरचिटणीस शिरीष चौधरी , प्रदेश सचिव डी. जी. पाटील उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमास सर्व सन्मा.प्रदेश प्रतिनिधी, आजी/माजी खासदार, आमदार, काॅग्रेस अंतर्गत विभाग प्रदेश अध्यक्ष, फ्रंटल/सेल राज्य पदाधिकारी, जिल्हा काॅग्रेस व शह रचे पदाधिकारी,सदस्य, फ्रंटल व सेलचे सन्मा. जिल्हा व तालुका अध्यक्ष शहर/तालुका काॅग्रेस कमिटीचे ब्लॉक अध्यक्ष, जिल्हा परिषदेचे आजी/माजी सदस्य, पदाधिकारी, नगर परिषद/नगर पंचायतचे आजी/माजी अध्यक्ष, पदाधिकारी, सदस्य, पंचायत समितीचे आजी /माजी सभापति व सदस्य, कृ.उ. बाजार समितीचे आजी/माजी सभापति व संचालक तसेच काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यानी उपस्थित राहावे, असे आवाहन जळगांव जिल्हा ग्रा. व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने विनंती करण्यात आले आहे.