Wednesday, December 3, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

मराठा महासंघ आणि शिंपी समाजाचा महायुतीचे उमेदवार मंगेश चव्हाण यांना जाहीर पाठिंबा

by Divya Jalgaon Team
November 10, 2024
in Uncategorized
0
मराठा महासंघ आणि शिंपी समाजाचा महायुतीचे उमेदवार मंगेश चव्हाण यांना जाहीर पाठिंबा

चाळीसगाव प्रतिनिधी – चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार व महायुतीचे अधिकृत मंगेश चव्हाण यांच्या विकासात्मक नेतृवावर विश्वास ठेवून आणि सर्वसमावेशक समाजकारणाला प्रभावित होऊन अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने आ.मंगेश चव्हाण यांना अधिकृत पाठिंबा जाहिर करण्यात आला आहे. निवडणूक जवळ येत असताना दिवसेंदिवस वाढत चाललेला विविध संघटनांचा पाठिंबा यामुळे विकास कामांसाठी अजुनच बळ मिळत असल्याचे यावेळी आ.मंगेश चव्हाण यांनी सांगितले.
अखिल भारतीय मराठा महासंघाच्या सर्व पदाधिकार्यांनी आमदार मंगेशदादा चव्हाण यांना भेटून आणि सगळ्यांच्या सह्या करुन संघटनेच्या अधिकृत लेटरवर लेखी स्वरूपात आपला पाठिंबा जाहिर केला आहे. यावेळी मराठा महासंघाचे जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख खुशाल बिडे पाटील, अशोक भोसले जिल्हा कोषाध्यक्ष, नंदकिशोर पाटील शहर अध्यक्ष, अमोल पाटील तालुकाध्यक्ष, किरण जाधव उप शहराध्यक्ष, शेखर पाटील तालुका संघटक, सुरेश कोल्हे, आकाश राणा, प्रल्हाद बळे, प्रथम पाटील, रामराव पाटील, कैलास पाटील, जयसिंग सोनवणे, रामदास पाटील, भगवान पाटील, सोमनाथ मोहिते, सुरेश पाटील, महेश पाटील, दत्तात्रेय पाटील, बापुराव पाटील, युवराज शिंदे, योगेश नवले, कल्पेश महाले, रामदास शिंदे, दिगंबर पाटील, मनोज गुंजाळ, रविंद्र देशमुख, सागर गायकवाड, कृष्णा पवार, दिलीप सोनवणे, दिनेश नवले, विजय पाटील यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी स्वाक्षऱ्या करुन पाठिंबा जाहीर केला आहे.
चाळीसगाव शिंपी समाजाचे माजी अध्यक्ष दिलीप कापडणे यांच्यासह समाजातील अनेक मान्यवरांनी आमदार मंगेश चव्हाण यांच्या निवासस्थानी त्यांची सदिच्छा भेट घेऊन आपला पाठिंबा दर्शविला. यावेळी समाजातील महिला व तरुणांची उपस्थिती लक्षणीय होती.यावेळी शिंपी समाजाच्या वतीने आमदार मंगेश चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला.

Share post
Previous Post

ईश्वर कॉलनीत दिवाळी, आ. राजूमामा भोळेंचे फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत

Next Post

जळगाव ग्रामीणचा सर्वांगिण विकास हाच गुलाबराव देवकरांचा ध्यास

Next Post
जळगाव ग्रामीणचा सर्वांगिण विकास हाच गुलाबराव देवकरांचा ध्यास

जळगाव ग्रामीणचा सर्वांगिण विकास हाच गुलाबराव देवकरांचा ध्यास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group