Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

फुलांच्या वर्षावात मेहरुण परिसरात आ. राजूमामा भोळे यांचे नागरिकांकडून स्वागत

पंचशील नगर, गवळीवाडा, कुंभारवाडा, अक्सा नगर परिसरात रॅलीत मोठा उत्साह

by Divya Jalgaon Team
November 8, 2024
in जळगाव, राजकीय
0
फुलांच्या वर्षावात मेहरुण परिसरात आ. राजूमामा भोळे यांचे नागरिकांकडून स्वागत

जळगाव – जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांनी मेहरुण परिसरामध्ये शुक्रवारी सकाळी भव्य प्रचार रॅली काढली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात आपल्या प्रेमळ नेत्यांवर फुलांचा वर्षाव करून नागरिकांनी जोरदार स्वागत केले.

आमदार राजूमामा भोळे यांनी इच्छादेवी चौकात इच्छादेवी मंदिर येथे पूजा अर्चा करून देवीचे दर्शन घेऊन आज आज पहिल्या टप्प्यातील प्रचाराला सुरुवात केली. तेथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून पंचशील नगर, गुरुद्वारा परिसर, गवळीवाडा परिसर, गुलाब बाबा कॉलनी, भीलवाडा, कुंभारवाडा, जय जवान चौक, अक्सा नगर, दत्तनगर मार्गे रामनगर परिसरात रॅलीचा समारोप झाला. तांबापुरा भागातील हजरत बिलाल चौकामध्ये ट्रस्टच्या पदाधिकारी व सदस्यांनी आमदार राजूमामा भोळे यांना पुष्पगुच्छ देऊन भावपूर्ण सत्कार केला.

तसेच मेहरुण मधील ग्रामदैवते श्री विठ्ठल मंदिर, भवानी माता मंदिर यासह महादेव मंदिर या ठिकाणी पूजा अर्चा करून विजयासाठी साकडे घातले. परिसरातील गोपीनाथराव मुंडे चौकामध्ये महिला भगिनींनी आ. राजूमामा भोळे यांना औक्षण करण्यासाठी गर्दी केली होती. या प्रसंगी, “आता २३ तारखेनंतर मंत्री होऊनच मेहरुणमध्ये या” असा आशीर्वाद महिला भगिनींनी आमदार राजूमामा भोळे यांना दिला. मुंडे चौकातील प्रसिद्ध साईबाबा मंदिरात नागरिकांनी शाल,श्रीफळ देऊन आ. भोळे यांचा सत्कार केला.

रॅलीमध्ये माजी नगरसेवक सदाशिवराव ढेकळे, मंडळ क्रमांक ८ चे अध्यक्ष महादू सोनवणे, माजी नगरसेवक राजेंद्र घुगे पाटील, कैलास सोनवणे, अनिल देशमुख, मधुकरराव ढेकळे, गौरव ढेकळे, गजानन वंजारी, किशोर वाघ, मुकेश किसे, युवराज बोरसे, रामेश्वर मालचे, तुकाराम पाटील, विनोद मराठे, पिंटू ढेकळे, प्रशांत सोनवणे, महादू लाडवंजारी, किरण खडके, विनोद मराठे, पिंटू बेडिस्कर, लता सोनवणे, शिवसेनेचे माजी नगरसेवक गणेश सोनवणे, ज्योती चव्हाण, महिला जिल्हाप्रमुख सरिता माळी कोल्हे, कुंदन काळे, आशुतोष पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे अर्चना कदम, शोभा भोई, ममता तडवी, जयश्री पाटील, साजिद पठाण, जितेंद्र चांगरे, रिपाई (आठवले) गटाचे जिल्हाध्यक्ष अनिल अडकमोल, प्रताप बनसोडे, मिलिंद अडकमोल, नाना भालेराव, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे लल्लन सपकाळे, लोक जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दीपक सपकाळे, जिल्हाध्यक्ष अशोक पारधे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share post
Tags: #Jalgaon City Assembly#Rajumama bhole#जळगाव शहर विधानसभा#प्रचार रॅली#विधानसभा निवडणूक २०२४आ.राजूमामा भोळे
Previous Post

….तर भाजपाला मतदान करु नका – बाळासाहेब थोरात

Next Post

जैन हिल्स येथे फिडे आरबिटर सेमिनाराची सुरवात

Next Post
जैन हिल्स येथे फिडे आरबिटर सेमिनाराची सुरवात

जैन हिल्स येथे फिडे आरबिटर सेमिनाराची सुरवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group