जळगाव – जळगाव ग्रामीणमधील महाविकास आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांनी श्री क्षेत्र पद्मालय देवस्थानावर बुधवारी सकाळी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी गणेशाची मनोभावे प्रार्थना करून त्यांनी विजयासाठी साकडे देखील घातले.
पद्मालय देवस्थानावर प्रचार नारळ वाढविल्यानंतर माजी मंत्री गुलाबराव देवकर तसेच शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी जळगाव व धरणगाव तालुक्यातील उपस्थित सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर म्हसावद-बोरनार जि.प.गटातील प्रचाराला सुरूवात करण्यात आली. दिवसभरात म्हसावदसह बोरनार, लमांजन, वाकडी, कुऱ्हाडदे, पाथरी, वडली, डोमगाव, जवखेडा व परिसरातील बऱ्याच गावांना भेटी देण्यात आल्या. माजी मंत्री देवकरांचे प्रत्येक गावात फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत करण्यात आले. ठिकठिकाणी महिलांनी त्यांचे औक्षण सुद्धा केले.
यावेळी उद्धव सेनेचे जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, उपजिल्हा प्रमुख प्रा.भाऊसाहेब सोनवणे, धरणगावचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष नीलेश चौधरी, दीपक वाघमारे, जळगाव तालुका प्रमुख उमेश पाटील, राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, जळगाव तालुकाध्यक्ष बापू परदेशी, युवक तालुकाध्यक्ष विनायक चव्हाण, युवक राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस भूषण पाटील, किसान सेलचे तालुकाध्यक्ष रवींद्र पाटील, धरणगाव शहर अध्यक्ष लक्ष्मण पाटील, कार्याध्यक्ष अरविंद देवरे, मोहन पाटील, युवक तालुकाध्यक्ष मनोज पाटील, जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती लक्ष्मण पाटील, विद्यमान उपसभापती प्रा.पांडुरंग पाटील, संचालक डॉ.अरूण पाटील, योगराज सपकाळे, गोकूळ चव्हाण, दापोरा येथील नानाभाऊ सोनवणे, शिरसोली येथील गोलू पवार, म्हसावद येथील कैलास पाटील, विवेक चव्हाण, संजय पाटील आदी उपस्थित होते.