जळगाव – शिवसेना ठाकरे गटात विधानसभेच्या पार्श्वभूमीवर लोकांना पक्षाशी जोडण्याचं सध्या काम सुरु असून उद्धव बाळासाहेब ठाकरे व आदित्य ठाकरे यांचा मार्गदर्शनातून सक्रियपणे प्रचार व प्रसार करण्यास तसेच शिवसेना पक्ष वाढविण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात नियुक्त्या देणं सुरु असून शिवसेना नेते संजय राऊत व जिल्हा संपर्कप्रमुख व उपनेते संजय सावंत यांच्या आदेशाने निष्ठावंत शिवसैनिक म्हणून जळगाव तालुका सचिवपदी सचिन वसंत चौधरी यांना नियुक्त करण्यात आले तर तालुका उपाध्यक्षपद संजय पवार यांना देण्यात आले तसेच उपसंघटकपद मुकेश पाटील रा. शिरसोली या सर्वांना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करून शुभेच्छा देण्यात आले.
यावेळी जळगाव तालुका प्रमुख उमेश पाटील, युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख अविनाश पाटील, शिवसेनेचे तालुका समन्वयक विजय लाड सह पदाधिकारी व यांची उपस्थिती होती.