जळगाव – पिछाडीवर पडलेल्या जळगाव मतदारसंघाच्या भरीव विकासासाठी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचे हात बळकट करण्याकरीता नशिराबाद येथील असंख्य तरूणांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात नुकताच जाहीर प्रवेश केला. स्वतः श्री.देवकर यांनी सर्वांचे पक्षाच्या वतीने मनःपूर्वक स्वागत केले.
आपण जळगाव ग्रामीणमध्ये मंत्रीपदाच्या काळात केलेली विकासकामे आज देखील दिमाखात उभी आहेत. मात्र, नंतर सत्तेवर आलेल्या लोकप्रतिनिधींनी कोणतीच ठोस कामे केली नाहीत. जेवढी पण कामे केली, ती अतिशय निकृष्ठ दर्जाची आहेत. अनेक कामे गेल्या १० वर्षांपासून तशीच अर्धवट पडली आहेत. अपूर्ण राहिलेली सर्व कामे पूर्ण करण्यासह मतदारसंघातील बेरोजगारांना हक्काचा रोजगार मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी दिली. याप्रसंगी मजूर फेडरेशनचे माजी सभापती लीलाधर तायडे, विधानसभा क्षेत्रप्रमुख पंकज महाजन, तालुकाध्यक्ष बापू परदेशी, माजी जि.प.सदस्य रवींद्र पाटील, राष्ट्रवादीचे नरेंद्र उर्फ नानाभाऊ सोनवणे, जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती पांडुरंग पाटील, संचालक योगराज सपकाळे, डॉ.अरूण पाटील, गोकूळ चव्हाण आणि धरणगाव बाजार समितीचे संचालक दिलीप धनगर, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस बरकत अली, पाथरीचे माजी सरपंच नीलेश पाटील, शिरसोलीचे भूषण पाटील आदी उपस्थित होते.
‘यांनी’ केला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश
प्रफुल्ल रवींद्र नाथ, भाऊलाल दिलीप नाथ, संदीप हरी नाथ, निवृत्ती केशव नाथ, एकनाथ नाथ, हिरामण श्रावण नाथ, सचिन एकनाथ नाथ, मोतीराम मोहन नाथ, संजय सुका नाथ, पांडुरंग खंडू नाथ, दीपक विश्वनाथ नाथ, आदिनाथ आनंदा नाथ, देवगण शिवदास नाथ, गोविंदा हिरामण नाथ, डिगंबर काशिनाथ नाथ, हेमंत राजू नाथ, प्रेम अरूण नाथ, तेजस आनंदा नाथ, अरूण बापू नाथ, रवींद्र शालीक नाथ.