जळगाव – श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात किशोरवयीन मुलींसाठी जनसाहस सोशल डेव्हलपमेंट कडून विविध समस्येवर समुपदेशन सत्राचे आयोजन दि. 9 ऑक्टोबर रोजी संत ज्ञानेश्वर विद्यालयात किशोरवयीन मुलींसाठी कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपशिक्षिका शितल कोळी व प्रमुख अतिथी म्हणून उपशिक्षिका उज्वला नन्नवरे उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी विद्यालयातील किशोरवयीन विद्यार्थीनींना गुड टच बॅड टच, हिंसा याबद्दल समुपदेशक तेजल पाटील यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला चित्राली बढे व दिनेश हंसकर उपस्थित होते.
चित्राली बढे यांनी आपल्या मार्गदर्शनातून मुलींचे आरोग्य किती महत्त्वाचे आहे. आणि मुलींनी प्रसंगी दुर्गा झाली पाहिजेत, आपणच आपले संरक्षण केले पाहिजे. त्यासाठी कराटे आणि मैदानी खेळ खेळले पाहिजेत. मोबाईलचा आणि इंटरनेट चा वापर चांगल्या कामासाठीच करावा. टीव्ही वरील प्रोग्राम काय पहायचे आणि काय नाही यावर स्वतः बंधन घातले पाहिजेत. असे सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला यावेळी सर्व शिक्षिका उपस्थित होत्या.