भुसावळ प्रतिनिधी । बिहार विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसह गुजरात, मध्यप्रदेशातील पोटनिवडणुकीत भाजपने उल्लेखनीय यश मिळवले. बिहारमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या विजयाचे येथील भाजप पदाधिकार्यांनी जोरदार जल्लोष करून स्वागत केले. बिहार विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसह गुजरात, मध्यप्रदेशातील पोटनिवडणुकीत भाजपने उल्लेखनीय यश मिळवले.
यानिमित्त शहर भाजपने बुधवारी जामनेररोडवरील आमदार सावकारे यांच्या कार्यालयासमोर आतषबाजी केली. यावेळी नगरसेवक युवराज लोणारी, राजेंद्र नाटकर, महेंद्रसिंग ठाकूर, निर्मल कोठारी, मुकेश पाटील, अजय भोळे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा शैलेजा पाटील, राजेंद्र आवटे, गिरीश महाजन, सतीश सपकाळे, अजय नागराणी, संतोष बारसे, प्रमोद सावकारे, प्रा. प्रशांत पाटील, वासुदेव बोंडे, प्रकाश बतरा, अर्जुन खरारे, पवन बुंदेले, खुशाल जोशी, अमोल महाजन आदी उपस्थित होते. दरम्यान, या जल्लोषात नगराध्यक्ष रमण भोळे, प्रा. सुनील नेवे, भाजपचे शहराध्यक्ष दिनेश नेमाडे, माजी शहराध्यक्ष पुरुषोत्तम नारखेडे, नगरसेवक अॅड. बोधराज चौधरी, प्रमोद नेमाडे, भाजयुमोचे शहराध्यक्ष अनिकेत पाटील आदी एकनाथराव खडसे यांचे समर्थक गैरहजर असल्याचे दिसून आले.