जळगाव – संपूर्ण जगात ईद ए मिलादुन्नबी अर्थातच अंतिम प्रेषित हजरत मुहम्मद (स) यांची जयंती साजरी केली जात असते. यंदा भारतात ती दि. १६ सप्टेंबर २०२४ ला साजरी होत आहे. अंतिम प्रेक्षितांच्या जयंती निमित्त जळगांव मध्ये सर्व समावेशक अशी सीरत कमेटी ची स्थापना मुफ्ती अतिकुर्रहमान यांच्या अध्यक्षतेखाली झाली असून, त्या समितीमार्फत दि. १८ व १९ सप्टेंबर २०२४ रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
आपल्या पालन कत्यनि एक जिवा (आदम) पासून निर्माण केले आहे. हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई आणि पारशी सर्व आपसात भाऊ आहे. अशाप्रकारे इस्लाम फक्त मुसलमानाचा धर्म नाही, तर पालनकर्त्या पासून मानवतेचे हजरत मुहम्मद (स) वर कुरानाच्या माध्यमातून संपूर्ण मानव जातीसाठी पाठविलेला धर्म आहे. हा सर्व मानवतेसाठी शुभ संदेशाची दिप प्रज्वलीत करणारा मार्गदर्शक आहे. जशाप्रकारे वायु आणि प्रकाशावर कोणत्याही विशेष समुहाचा, कोणत्याही प्रकारचा अधिकार नाही तशाच प्रकारे इस्लामवर सुद्धा कोणत्याही विशेष समुहाची मक्तेदारी नाही. इस्लाम पालनकर्त्या (अल्लाह) चा आहे आणि पालनकर्त्यांकडून, पालनकर्त्यांच्या भक्तासाठी आहे.
समस्त मानव जातीला त्याच्या वास्तविक पालनकत्र्त्यांला समजण्याची आणि त्यांच्या शिकवणीवर आचार करण्याची संमती देवो हिच सर्व जगाच्या पालनकर्त्याशी प्रार्थना आहे, (आमिन) आम्ही आपल्या मुस्लिम व मुस्लिमेत्तर बांधवांना अत्यंत प्रेमपुर्वक व सद्भावनाने ईद ए मिलादुन्नबी निमित्त सादर आंमत्रित करीत आहोत.
मुस्लिम धर्माचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे धर्मगुरु मा. मौलाना खलिलउर्ररहेमान सज्जाद नोमानी साहेब हे दि. १८ व १९ सप्टेंबर २०२४ रोजी ईद ए मिलाद निमित्त आपले प्रवचन/व्याख्यान करणार आहे त्याचा लाभ सर्व समाज बांधवांनी घ्यावा, ही विनंती.
१) दि. १८ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६ ते रात्री ९ ।। वाजे पर्यंत इदगाह मैदानावर जाहिर प्रवचन ( खिताब ए आम) होणार आहे.
२) दि. १९ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपावेतो इकरा एच.जे.थीम कॉलेज ऑफ आर्टस् अॅन्ड सायन्स. के. के. मोतीवाला सभागृह गणेशपुरी मंदिरच्या मागे, मेहरुण जळगांव येथे मुस्लिमेत्तर (हिंदू) बांधवांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. (त्यात इस्लाम धर्माबाबत समज, गैरसमज हा प्रश्नोउत्तराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे.)
वरील दोन्ही कार्यक्रमाला जळगांव जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन सीरत कमेटी, जळगांव तर्फे करण्यात आलेले आहे.
धर्मगुरु मा. मौलाना खलिलउर्ररहेमान सज्जाद नोमानी साहेब यांचा थोडक्यात परिचय..
लखनौ येथे दि. १२ ऑगष्ट १९५५ रोजी जन्म, एक भारतीय इस्लामिक विद्वान, कुरानीक अभ्यासात डॉक्टरेट पुर्ण, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य व प्रवक्ते, शिक्षण तज्ञ आणि अनेक इस्लामिक पुस्तकांचे लेखक, इस्लामचे विद्वान व दारुल उलुम नदवातुल उलामा, मदिना इस्लामिक विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहेत. बामसेफ आणि वामन मेश्राम यांचे सोबत नोमानी यांनी प्रामुख्याने भारतातील अल्पसंख्याकांच्या हक्कासाठी विविध सक्रीयता उपक्रम सुरु केले. ते मुस्लिम मिरर चे संरक्षक देखील आहेत.
मौलाना नोमानी यांनी दारुल उलुम नदवातुल उलामा आणि दारुल उलूम देवबंद मधून पदवीधर होवुन त्यांच्या गांवी शिक्षण घेतले. नंतर त्यांनी मदिना इस्लामिक विद्यापीठात शिक्षण घेतले आणि कुरानिक अभ्यासात डॉक्टरेट पुर्ण केली. मौलाना नोमानी हे नक्शबंदी आदेशाचे शेख, विद्वान आणि शिक्षक आहे जो सुफी वादाचा एक प्रमुख सुन्नी अध्यात्मिक क्रम आहे. ते झुल्फीकार अहमद नक्शबंदी यांचे शिष्य आहेत.
“धर्म वाचवा – संविधान वाचवा या नांवाने धार्मिक अल्पसख्यांकाच्या संविधानिक 17 हक्क आणि श्रद्धा यांचे रक्षण करणेसाठी एक चळवळ, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने सुरु केली या मोहिमेचे नेतृत्व मौलाना नोमानी यांनी केले. त्यासाठी जनजागृतीसाठी देशभर फिरले.
भारतीय तरुणांना दहशतवादी संघटनाकडे आकर्षित होणेपासून रोखण्यासाठी त्यांनी सरकार, कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्था, धार्मिक विद्वान आणि प्रसार माध्यमासह पुढाकार घेतला.
मौलाना नोमानी यांचे वडील मंझुर नोमानी हे एक प्रसिद्ध इस्लामिक विद्वान, धर्मशास्त्रज्ञ, पत्रकार, लेखक व सामाजिक कार्यकर्ते होते. त्याचे आजोबा सुफी मुहम्मद हुसेन हे व्यापारी आणि जामीनदार होते.