जळगाव – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 13 ऑगस्ट, 2024 रोजीचा जळगांव जिल्हा दौरा असून तो खालील प्रमाणे आहे.
दुपारी 1.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, (गेट नं.08), मुंबई येथे आगमन व विमानाने जळगांव कडे प्रयाण, दुपारी 2.30 वाजता
जळगांव विमानतळावर आगमन व मोटारीने सागरपार्क, जळगांवकडे प्रयाण. दुपारी 3 वाजता महिला सशक्तीकरण अभियाना अंतर्गत ‘मुख्यमंत्री -माझी लाडकी बहिण योजना’ कार्यक्रम स्थळी आगमन. सायंकाळी 5.15 वाजता मोटारीने जळगांव विमानतळ, जळगांवकडे प्रयाण. सायंकाळी 5.30 वाजता जळगांव विमानतळ, जळगांव येथे आगमन व विमानाने मुंबईकडे प्रयाण.