जळगाव – शहरातील बालकांमध्ये नाट्यसंस्कार रुजून त्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगिण विकास व्हावा म्हणून उन्हाळी सुट्टीमध्ये बालरंगभूमी परिषद, जळगाव शाखा तसेच नाट्यरंग जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने बालरंग नाट्य प्रशिक्षण शिबिर घेण्यात येत आहे.
पी.व्ही.आर.सिनेमाच्या भरारी फाऊंडेशनच्या सभागृहात सुरु असलेल्या या शिबिरात आज पालक विद्यार्थी संवाद कार्यशाळा संपन्न झाली. यात खेळाच्या माध्यमातून पालक आणि विद्यार्थी यातील सुसंवाद तसेच ‘आमचेही म्हणणे ऐकून घ्या’ या सदरात पालक व विद्यार्थी या दोघांच्याही भूमिका जाणून घेण्यात आल्या. या कार्यशाळेला बालरंगभूमी परिषदेचे अध्यक्ष योगेश शुक्ल व प्रमुख कार्यवाह तसेच खान्देश लोककलावंत परिषदेचे अध्यक्ष विनोद ढगे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी नाट्यरंगच्या अध्यक्षा दिशा ठाकूर यांच्यासह अमोल ठाकूर, नाट्यरंगचे कलावंत, शिबिरार्थी व पालक यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता.