जळगाव – सरकारी योजना जनतेच्या पैशातून राबविल्या जातात आणि आता
सरकारी योजनांच्या प्रत्येक जाहिरात मध्ये भारत सरकार ऐवजी मोदी सरकार म्हटले जाते म्हणून आता सर्वांना मोदी सरकार नको तर आम्हाला आमचे हक्काचे भारत सरकार पाहिजे तेच भारत सरकार ज्या भारत सरकारच्या काळात माझ्या शेतकरी बांधवांच्या कांद्याला योग्य भाव मिळेल,माझ्या तरुणांना रोजगार मिळेल माझ्या माता भगिनी सुरक्षित राहतील ते भारत सरकार आम्हाला पाहिजे या मातीमध्ये आज जो शेतकरी बांधवांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो आहे त्या माझ्या शेतकरी बांधवांना त्यांच्या मागण्या सरकारकडे मागण्याचा अधिकार आम्हाला हवाय असे आम्हाला आमच्या हक्काचे भारत सरकार हवे आहे आता मोदी सरकार नको आहे. म्हणून योग्य व्यक्तीला मतदान करून प्रत्येक ठिकाणी भारत सरकार म्हटले जाईल असे शेतकरी, कष्टकरी महिला ,तरुणांना न्याय देणारे भारत सरकार आणाअसे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी मनमाड येथिल प्रचार सभेत केले.
दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी-इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार भास्कर मुरलीधर भगरे गुरुजी यांच्या प्रचारार्थ
मनमाड येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांची प्रचार सभा पार पडली
या सभेस संबोधित करताना रोहिणी खडसे म्हणाल्या आजच्या सभेत उपस्थित प्रत्येकाचा उत्साह आहे हा उत्साह आम्हा सर्वांना विश्वास देतो तुम्ही भगरे सरांना मतदान करून निवडून आणाल याचीच नांदी आजच्या उत्साहातून बघायला मिळते आहे,येत्या विस तारखेला फक्त स्वतः साठी मतदान करायचे नसुन विस तारखेला मतदानातून सर्वांनी सरकारच्या दहा वर्षाच्या कार्यकाळाचा सरकारने केलेल्या कामांचा आणि विद्यमान खासदारांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळाचा जाब विचारायचा आहे.
इथल्या लोकप्रतिनिधी खासदार झाल्या मंत्री झाल्या आरोग्य मंत्री पद मिळाले पण मंत्रीपदाच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षात मतदारसंघाला काय दिले?
मतदारसंघात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आले का किंवा मोठे आरोग्य केंद्र आले का?किंवा आरोग्याच्या इतर सोयी मिळाल्या का? कोरोना काळात केंद्रीय आरोग्य मंत्री पद भूषवले राजेश भैय्या टोपे यांनी राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली कोरोना काळात आरोग्यमंत्री म्हणून केलेल्या उत्कृष्ठ कार्याची जगभरात दखल घेतली गेली.
दुसरीकडे केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचे कार्य आपण बघितले कोरोना काळात उत्तरप्रदेशात नदीतून मृतदेह वाहतानाचे व्हिडीओ आपण बघितले अशी त्यावेळी परिस्थिती होती याचा जाब विस तारखेला विचारायचा आहे
विस तारखेला मतदानाला जाल तेव्हा या प्रत्येक गोष्टीचा जाब विचारून विचारपूर्वक मतदान करायचे आहे.
आज आपण सरकारी योजनांच्या जाहिराती बघतो सरकारी योजना जनतेच्या कराच्या पैशातून राबविल्या जातात पण आता या योजनांच्या प्रत्येक जाहिराती मध्ये आपल्याला भारत सरकार ऐवजी मोदी सरकार म्हटलेले दिसते दहा वर्षाच्या काळात भारत सरकारचे मोदी सरकार केले गेले सत्ताधाऱ्यांना भारत सरकार म्हणायची लाज वाटते. भारत सरकार बदलवून हे मोदी सरकार म्हणत आहेत ज्या भारत देशाचे नाव घेतले तरी अंगावर शहारे येतात त्या भारत देशाचे सरकार आणायची जबाबदारी हि तुमची आमची आहे याच्यापुढे नो मोदी सरकार आम्हाला आमचे हक्काचे भारत सरकार पाहिजे.
तेच भारत सरकार ज्या भारत सरकारच्या काळात माझ्या शेतकरी बांधवांच्या कांद्याला योग्य भाव मिळेल माझ्या तरुणांना रोजगार मिळेल माझ्या माता भगिनी सुरक्षित राहतील ते भारत सरकार आम्हाला पाहिजे
या मातीमध्ये आज जो शेतकरी बांधवांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो आहे त्या माझ्या शेतकरी बांधवांना त्यांच्या मागण्या सरकारकडे मागण्याचा अधिकार आम्हाला हवाय असे आम्हाला आमच्या हक्काचे भारत सरकार हवे आहे आता मोदी सरकार नको आहे.