Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

महाविकास आघाडीचे उमेदवार करणदादा पाटील यांचे शिरसोली, चिंचोली, धानवड येथे जोरदार स्वागत

विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांच्या घेतल्या भेटी

by Divya Jalgaon Team
May 2, 2024
in जळगाव, राजकीय
0
महाविकास आघाडीचे उमेदवार करणदादा पाटील यांचे शिरसोली, चिंचोली, धानवड येथे जोरदार स्वागत

जळगाव – महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार करण बाळासाहेब पाटील यांच्या प्रचाराला सुरूवात झाली असून शुक्रवार दि. २६ रोजी जळगाव तालुक्यात शिरसोली, चिंचोली, धानवड आदी गावांमध्ये प्रचार रॅली काढण्यात आली. सर्वच गावांमध्ये करणदादा पाटील यांचे फटाक्यांची आतषबाजी करून जोरदार स्वागत करण्यात आले.

शिरसोली येथे श्री गणेश व हेमाडपंथी दक्षेश्वर महादेव मंदिरात जाऊन पूजाअर्चा करून प्रचाराला प्रारंभ करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी करणदादा तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, महाविकास आघाडीचा विजय असो, अशा विविध घोषणा देऊन करणदादा पवार यांना विजयी करण्याचे आवाहन केले. गावात ठिकठिकाणी औक्षण करून करणदादा पवार यांचे स्वागत करण्यात आले. रॅली दरम्यान करणदादा पाटील यांनी नागरिकांशी संवाद साधला.

चिंचोली येथेही फटाक्यांची आतषबाजी आणि औक्षण करून स्वागत करण्यात आले. त्यानंतर गावतील विविध भागात जावून मशाल चिन्हाला मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. रॅली दरम्यान माजी सरपंच शरद घुगे, जंगलू देवबा लाड यांच्या घरी भेट  दिली.  धानवड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर प्रचाराला सुरुवात करण्यात आली. गावातील तरुणांनी स्वयंस्फुर्तीने रॅलीत सहभागी होवून करणदादा पाटील यांचे ठिकठिकाणीपुष्गुच्छ देवून स्वागत केले.

रॅलीत माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, शिवसेनाचे तालुकाप्रमुख उमेश पाटील, युवासेना धरणगाव तालुकाप्रमुख निलेश चौधरी, बाजार समितीचे माजी सभापती लक्ष्मण पाटील, काँग्रेस तालुका अध्यक्ष मनोज चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेस युवक जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक डॉ. अरुण पाटील, योगराज सपकाळे, धानवडचे उपसरपंच दिलीप चव्हाण, हेमंत पाटील, धवल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस संजय चव्हाण, तालुकाध्यक्ष मनोज चौधरी, उपाध्यक्ष रवी सोनवणे, सरचिटणीस मुरली सपकाळे, संदीप वाघ, रवींद्र चौधरी, सुभाष भंगाळे, बापू परदेशी, शिरसोली प्र.न.चे सरपंच हिलाल मल्हारी भिल्ल, उपसरपंच शशिकांत अस्वार, शिरसोली प्र.बो. चे सरपंच पती अर्जुन पवार, उपसरपंच समाधान जाधव, शिरसोली प्र.बो. ग्रामपंचायत सदस्य डिगंबर बारी, अर्जुन पवार, प्रदिप पाटील, रईस शेख, राजेंद्र बारी, प्रदिप खलसे, ईश्वर कोळी, जिल्हा उप संघटक विकास चौधरी, तालुका समन्वयक ठाकरे गट विजय लाड, युवा सेना उपजिल्हा प्रमुख अविनाश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुका उपाध्यक्ष शुभम लाड,  ग्रामपंचायत सदस्य विनोद बारी, गौतम खैरे, मिठाराम पाटील, भगवान बोबडे, एकनाथ सोनवणे, उत्तम अस्वार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे युवक जिल्हा सरचिटणीस भुषण पाटील, गोलु पवार, समाधान निकुंभ, शिवसेना तालुका संघटक बबन धनगर, धानवडचे अविनाश पाटील, भाऊसाहेब सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुका युवक उपाध्यक्ष विशाल पालवे,मयुर घुगे, पन्नालाल घुगे, सचिन धुमाळ, राकेश घुगे, योगेश अस्वार, ज्ञानेश्वर पाटील, भगवान पाटील, पंढरी पाटील यांसह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.

Share post
Tags: #karan patil#Karan Pawar#Lok Sabha candidate 2024#Lok Sabha candidate Karan Pawar Patil#Shiv Sena Thackeray group#प्रचारShivsenaUnmesh Patil
Previous Post

धरणगाव तालुक्यात घुमला ‘एकच वादा.., करण दादा’चा नारा

Next Post

मविआचे उमेदवार करणदादा पाटील यांना जळगाव ग्रामीण मतदार संघात जोरदार प्रतिसाद; ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत

Next Post
मविआचे उमेदवार करणदादा पाटील यांना जळगाव ग्रामीण मतदार संघात जोरदार प्रतिसाद; ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत

मविआचे उमेदवार करणदादा पाटील यांना जळगाव ग्रामीण मतदार संघात जोरदार प्रतिसाद; ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group