Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

भविष्यात शेतीला उत्तम भवितव्य: विद्यार्थ्यांनी शेती क्षेत्रात यावे – अशोक जैन

फाली संम्मेलनाच्या दुसऱ्या टप्प्याचा पारितोषिक वितरण सोहळा 

by Divya Jalgaon Team
May 2, 2024
in कृषी विषयी, जळगाव
0
भविष्यात शेतीला उत्तम भवितव्य: विद्यार्थ्यांनी शेती क्षेत्रात यावे – अशोक जैन

जळगाव – ‘शेतीला भवितव्य आहे, तुमच्या सारख्या विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनातच शेतीविषयी प्रेम निर्माण व्हावे, विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात यावे यासाठी फालीचे संम्मेलन गत दहा वर्षांपासून जैन हिल्स येथे आयोजले जाते. विद्यार्थ्यांनी यातून प्रेरणा घेत शेती क्षेत्रामध्ये आपले भवितव्य घडवावे असे आवाहन जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी फालीच्या दुसऱ्या टप्प्यातील विजेत्यांच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात केले.

यावेळी व्यासपीठावर फालीच्या उपाध्यक्षा नॅन्सी बॅरी, जैन इरिगेशनचे संचालक डॉ. एच.पी. सिंग, जैन फार्म फ्रेश फुडस् लि.चे संचालक अथांग जैन, गोदरेज अॅग्रोवेटचे डॉ. मोहन कुंभार, अनुप्रिया सिंग, यूपीएलचे योगेश धांडे, गणेश निकम, स्टार अॅग्रीचे सुरज पनपत्ते, निकिता शेळके, निलम मोटीयानी, अमूलचे अनिलकुमार बडाया, विक्रम जानी, महेंद्राच्या विशाखा पटोले, प्रॉम्प्टचे रितेश सुतारिया, उज्ज्वीवन स्मॉल बॅंकींगचे योगेश गुरदालकर, वैभव पाटील या कंपनी प्रतिनिधींची उपस्थिती होती.

यावेळी एका विद्यार्थीनीने जैन इरिगेशनच्या कंपनीच्या स्थापनेबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अशोक जैन म्हणाले की, ‘तुझ्या हातून असे काम व्हावे की, फक्त पाच सात व्यक्तींचे नव्हे तर हजारोंचे पोट भरेल त्या सोबत कीडा, मुंगीचेही पोट भरेल असा काही व्यवसाय कर..हा सल्ला माझ्या वडिलांना त्यांच्या आईकडून मिळाला. एका शेतकऱ्याच्या मुलाने सुरू केलेली ही कंपनी आहे. ही कंपनी तीन पिढ्यांच्या साठवलेल्या ७ हजार रुपयांच्या भांडवलावर सुरू होऊन, आज साडेसात हजार करोड रुपयांची उलाढाल होत आहे आणि ११ हजार लोक कंपनीत काम करत आहेत. मुख्यत्वाने शेती व शेतकरी यांच्यासाठीच जैन इरिगेशनचे जगभरात कार्य सुरू आहे.

  जैन फार्म फ्रेश फुडस् लि.चे संचालक अथांग जैन यांनी उपस्थितांशी संवाद साधला. फालीचे उपक्रम भविष्यातील उपक्रम इत्यादी बाबत चर्चा केली. यावेळी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून कंपनीच्या महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि गुजरात राज्यातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. फालीच्या उपाध्यक्षा नॅन्सी बॅरी यांनी देखील उपस्थितांशी संवाद साधला. फाली एज्युकेटर आणि फालीला सौजन्य देणाऱ्या कंपनी प्रतिनिधींचा सत्कार देखील यावेळी करण्यात आला. या कार्याक्रमाचे सूत्रसंचालन हर्ष नौटियाल यांनी तर आभारप्रदर्शन रोहिणी घाडगे यांनी केले.

बिझनेस प्लॅन प्रेझन्टेशन विजेते

ॲग्रीसेन्स: हरनेसिंग रिमोट सेन्सिंग फॉर प्रिसिजन ॲग्रीकल्चर- न्यू इंग्लिश स्कूल भालोद जि. जळगाव (प्रथम), सोरगम फिअस्ट – डॉ. आप्पासाहेब उर्फ एस. आर. पाटील उडगाव टेक्निकल हायस्कूल उडगाव ज़ि. कोल्हापूर (द्वितीय),  बायो सीएनजी – प्रभात विद्यालय हिंगोणे जि. जळगाव (तृतीय), नेचरल डाय ॲण्ड पावडर फॉर्म वालनट शेल-  आदर्श निवासी स्कूल बनासकाठा गुजरात (चौथा), मोरिंगा पावडर – सीताबाई पटवर्धन हायस्कूल कोल्हापूर (पाचवा) असे विजेते ठरले.

Share post
Tags: #agriculture#Fali#Jain irigation#कृषी क्षेत्र#शेतकरी संवाद#शेती#शेती विषयीजैन इरिगेशन
Previous Post

लोकशाही टिकविण्यासाठी आणि खोटारडेशाही बंद करण्यासाठी जनता सज्ज!

Next Post

धरणगाव तालुक्यात घुमला ‘एकच वादा.., करण दादा’चा नारा

Next Post
धरणगाव तालुक्यात घुमला ‘एकच वादा.., करण दादा’चा नारा

धरणगाव तालुक्यात घुमला 'एकच वादा.., करण दादा'चा नारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group