जळगाव – ‘प्रचंड मेहनत, उच्च तंत्रज्ञानाचा उपयोग करून मनापासून केलेली शेती खूप फायदाची ठरते.’ असा सूर शेतकरी संवादात निघाला. फाली १० व्या संमेलनाच्या तिसऱ्या टप्प्याच्या पहिल्या दिवशी फालीच्या विद्यार्थांनी प्रगतशील शेतकऱ्यांशी सुसंवाद साधला. या संवाद कार्यक्रमास ललीत चौधरी, पंकज चौधरी (वड्री), ज्ञानेश्वर हिवराळे (मांगलवाडी), अनिकेत भागवत पाटील( पिंपळगाव खुर्द. जामनेर), प्रणव महाजन (ऐनपूर), बाळू माणिक अहिरे (आमोदा) हे शेतकरी सहभागी झाले होते.
या संवाद कार्यक्रमात जैन इरिगेशन,युपीएल, स्टार अॅग्री, ओमनीवोर, टाटा रॅलीज, आय टी सी, महिंद्रा, प्रॉम्प्ट डेअरी सोल्युशन्स या कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी देखील सहभागी झाले होते त्यांच्याशी देखील फाली विद्यार्थ्यांनी मुक्तपणे संवाद साधला.
फाली संमेलनात तिसऱ्या टप्यातील सकाळ सत्रात विद्यार्थ्यांनी विविध शेती प्रयोग, प्रकल्पांना भेटी दिल्या. दुपार सत्राच्या या कार्यक्रमात परिश्रम, जैन हिल्स येथे गट चर्चा झाली. यात ११ गट आणि तितकेच विषय चर्चेसाठी निवडले गेले होते.
फाली १० व्या संमेलनाचा आज समारोप
२९ एप्रिल रोजी होणार आहे. त्यासाठी फालीचे अध्यक्ष तथा जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन, गोदरेज अॅग्रोव्हेटचे अभय पारनेरकर, स्टार अॅग्रीचे संचालक अमित अग्रवाल, कार्बन क्रेडीटवर काम करणारी संस्था ‘वराह’ चे सीईओ मधुर जैन तसेच युपीएल, स्टार अॅग्री, ओमनीवोर, टाटा रॅलीज, आय टी सी, महिंद्रा, प्रॉम्प्ट डेअरी सोल्युशन्स, एचडीएफसी बँक आणि समुन्नती या कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित असतील.
सकाळ सत्रात विद्यार्थ्यांचे विविध प्रकारचे बिझनेस प्लॅन सादर होतील तर दुपार सत्रात जैन हिल्स येथील आकाश ग्राउंडवर विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण इंहोव्हेशन मांडले जातील. विविध प्रकारच्या या नावीण्यपूर्ण इंहोव्हेशनचे परीक्षण करून पहिल्या पाच क्रमांकाच्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात येऊन फाली संम्मेलनाचा समारोप होईल.