जळगाव – जळगाव येथील युनिक उर्दू प्रायमरी व हायस्कूल मध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून यावेळी ध्वजारोहण सेवानिवृत्त मुख्याध्यापक अ.हमीद जनाब यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमात १ली ते १०वी च्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीवर गीत गायन, भाषण, नाटक सादर केले. या कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना अ. हमीद जनाब व इद्रीस सुलेमान हिंगोरा सेठ तर्फे रोख दोन हजार रुपये बक्षीस देऊन त्यांना प्रोत्साहन देण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव अ. कय्युम शाह होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सभासद इद्रीस सुलेमान हिंगोरा, इकरा शाहिन उर्दू हायस्कूल ज्युनिअर कॉलेजचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक शेख गुलाब इसाक, लईक अहमद, शेख साजिद , शफक्कत , सलीम खान,जमालोदिन खान शाळेचे मुख्याध्यापक मिर्जा विकार अहमद, शेख नईम व विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन शेख आयाज यांनी केले व कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.