Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

चाळीसगाव तालुक्यातील कुस्तीप्रेमींना आमदार मंगेशदादा चव्हाण यांची भेट

जळगाव जिल्ह्यातील पहिली रेसलिंग मॅट आता चाळीसगाव शहरात

by Divya Jalgaon Team
October 7, 2023
in क्रीडा, जळगाव
0
चाळीसगाव तालुक्यातील कुस्तीप्रेमींना आमदार मंगेशदादा चव्हाण यांची भेट

चाळीसगाव – खानदेशातील कुस्तीप्रेमींची चाळीसगाव ही पंढरी म्हणून ओळखली जाते. राज्याला ट्रिपल महाराष्ट्र केसरी सह अनेक दिग्गज नामवंत मल्ल देणाऱ्या चाळीसगाव तालुक्यात मातीतली कुस्ती आजपर्यंत खेळली जात होती. काळ बदलला तशी कुस्तीचे प्रकार बदलले आणि माती सोबतच मॅटची कुस्ती देशभरात होऊ लागली, शालेय तसेच राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय स्तरावर तर फक्त मॅटचीच कुस्ती होत असल्याने ज्या व्यायाम तालीमीत मॅट असेल तिथे जाण्याचा पैलवानांचा ओघ वाढू लागला. मात्र संपूर्ण जळगाव जिल्ह्यात अत्याधुनिक रेसलिंग मॅट नसल्याने कुस्तीप्रेमींची मोठी निराशा होती.

गेल्या अनेक वर्षांपासून चाळीसगाव तालुक्याकडे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्षपद असूनदेखील चाळीसगाव येथे अत्याधुनिक रेसलिंग मॅट उपलब्ध नसल्याने पैलवानांची मोठी गैरसोय होत होती. चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी आपल्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी चाळीसगाव शहरात रेसलिंग मॅट देण्याचे आश्वासन दिले होते. त्यांनी आपला दिलेला शब्द पाळला असून कुस्तीची मोठी परंपरा असणाऱ्या शहरातील हनुमानवाडी स्थित जय श्रीराम बलभीम व्यायामशाळेला त्यांनी ४ लाखांची रेसलिंग मॅट भेट दिली आहे. जळगाव जिल्ह्यातील हि पहिली रेसलिंग मॅट असून तिचे नुकतेच उद्घाटन आमदार मंगेशदादा चव्हाण व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाल्याने तसेच आता मॅटच्या कुस्तीसाठीचे सराव करणे सोपे होणार असल्याने सर्व चाळीसगाव तालुक्यातील कुस्तीप्रेमींनी आमदार मंगेशदादा चव्हाण यांचे आभार मानले आहेत.

सदर उद्घाटन प्रसंगी कृषी उतपन्न बाजार समितीचे सभापती कपिल पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संजय पाटील, जय श्रीराम बलभीम व्यायामशाळेचे पदाधिकारी मनोहरदास बैरागी पैलवान, दीपक शुक्ला, अण्णा कोळी, अण्णा गवळी, तमाल देशमुख, किरण देशमुख, सतीशनाना पवार, सुधाकर पालवे, माजी नगरसेवक नितीन पाटील, भास्कर पाटील, मनोज गोसावी, योगेश खंडेलवाल, बबन पवार, आबा पोलीस, जितेंद्र वाघ, संभाजी घुले, कुणाल कुमावत, राहुल पाटील, सचिन दायमा सर, बंडू पगार, भरत गावडे, संभा पाटील, पिंटू पाटील, रवींद्र शुक्ल यांच्यासह तालुकाभरातील कुस्तीप्रेमी उपस्थित होते.

कुस्ती साठी बोलून नाही तर करून दाखवणार – आमदार मंगेश चव्हाण

मी बोलून नाही तर काम करून दाखवणारा कार्यकर्ता आहे, चाळीसगाव तालुक्यातील कुस्तीचे संवर्धन करणे एक लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी आहे असे मी समजतो. काही महिन्यांपूर्वी आमदार केसरी या भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन करून तालुक्यातील खेळाडूना मैदान उपलब्ध करून दिले होते. गेल्या अनेक वर्षांपासून चाळीसगाव तालुक्याला जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्षपद असूनही एकही रेसलिंग मॅट नसल्याची खंत अनेकांनी बोलून दाखवली होती, कुणी काय केले काय नाही केले यात न पडता आपण काय करू शकतो यावर माझा विश्वास आहे. त्यामुळे कुठल्याही शासकीय निधीचे आश्वासन न देता एक कर्तव्य म्हणून ४ लाखांची रेसलिंग मॅट जय श्रीराम बलभीम व्यायामशाळेला उपलब्ध करून दिली आहे, त्याचा तालुक्यातील सर्व मल्लांनी लाभ घ्यावा व पै.विजय चौधरी यांच्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावर चाळीसगावचे नाव उंचवावे, पुढील काळात देखील कुस्तीसाठी जे काही करता येईल ती सर्व मदत करेन अशी प्रतिक्रिया आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी यावेळी दिली.

Share post
Tags: #Mangesh Chavhan#The wrestling mat#कुस्तीchalisgao
Previous Post

चाळीसगाव तालुका संजय गांधी निराधार समिती जाहीर

Next Post

युवारंगच्या “कान्ह कलानगरी” लोगोचे विमोचन

Next Post
युवारंगच्या “कान्ह कलानगरी” लोगोचे विमोचन

युवारंगच्या “कान्ह कलानगरी” लोगोचे विमोचन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group