जळगाव – श्री संत ज्ञानेश्वर महाराज क्रीडा, सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळ संचलित श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक माध्यमिक विद्यालयाच्या संचालिका स्वर्गवासी सुभद्राताई सुरेश नाईक यांच्या तृतीय पुण्यस्मरण निमित्त शाळेतील गरीब होतकरू मुलांना शाळेचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रशांत सुरेश नाईक च्या तर्फे मोफत गणवेश वाटप करण्यात आले.
शालेय जीवनात गरीब व होतकरू विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून दरवर्षी १५/२० विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष प्रशांत नाईक यांच्याकडून मोफत गणवेश वितरण केले जाते. प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक सर व सर्व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रूपाली आव्हाड व आभार उज्वला नन्नवरे मॅडम यांनी मानले.