जळगाव प्रतिनिधी । रूग्णांची कोरोनाच्या काळामध्ये अहोरात्र सेवा करणार्या महापालिका रुग्णालयातील ११ डॉक्टर, दोन अधिपरिचारिकांचा सत्कार पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मनपा रुग्णालयातील ११ डॉक्टर, दोन अधिपरिचारिका यांचा सत्कार पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोविड केअर युनिटचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी अल्पसंख्याक महाराष्ट्राचे अध्यक्ष अब्दुल गफ्फार मलिक होते. फारुख शेख यांनी कोविड केयर युनिटचा आढावा सादर केला. अनिस शहा यांनी सूत्रसंचालन केले. अनवर खान यांनी आभार मानले. या कार्यक्रमात जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांच्या हस्ते मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी, डॉ. पल्लवी पाटील, डॉ. विजय घोलप, डॉ. हेमलता नेवे, डॉ. संजय पाटील, डॉ. सायली पवार, डॉ. नेहा भारंबे, डॉ. सोनल कुलकर्णी, डॉ. मनीषा उगले, डॉ. पल्लवी नारखेडे, डॉ. शिरीष ठुसे, डॉ. पवन ढाकणे अधिपरिचारिका मारिया आरोळे व संगीता पाटील यांचा गौरव करण्यात आला.