Sunday, December 7, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आंतरराज्य वरिष्ठ महिला टि-२० क्रिकेट स्पर्धेची फायनल पश्चिम बंगाल व महाराष्ट्र संघात रंगणार

by Divya Jalgaon Team
September 25, 2023
in क्रीडा, जळगाव
0
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आंतरराज्य वरिष्ठ महिला टि-२० क्रिकेट स्पर्धेची फायनल पश्चिम बंगाल व महाराष्ट्र संघात रंगणार

जळगाव – महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन व जैन स्पोर्टस् अॅकॅडमी आयोजित राष्ट्रीय पातळीवरील महिला क्रिकेट स्पर्धा जळगाव येथील अनुभूती निवासी स्कूलच्या क्रिकेट मैदानावर दि. १५ ते २३ सप्टेंबर दरम्यान सुरू आहे.

वरिष्ठ गटाच्या या स्पर्धेत गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या बलाढ्य पश्चिम बंगाल संघाला नमवत महाराष्ट्र संघाने फायनलमध्ये दिमाखात धडक मारली. उद्या (दि. २३) दुपारी १.३० वाजता दोघांमध्ये अंतिम सामना होईल. तत्पुर्वी तिसऱ्या क्रमांकासाठी तामिळनाडू विरूद्ध त्रिपुरा यांच्यात सकाळी ९.३० वाजता सामना खेळविला जाणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) तर्फे घेण्यात येणाऱ्या आंतरराज्य महिला वरिष्ठ गटाच्या स्पर्धेपुर्वी जळगावात प्रथमच होणाऱ्या यास्पर्धेकडे राष्ट्रीय स्पर्धेची पुर्व तयारी स्पर्धा म्हणून बघितले जात आहे.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आंतराज्य वरिष्ठ टि-२० क्रिकेट स्पर्धा-२०२३ च्या आजच्या दिवसाची सुरवात त्रिपुरा विरूद्ध तामिळनाडू यांच्यात खेळविला गेलेल्या सामन्याने झाली. तामिळनाडूने नाणेफेक जिंकून गोलंदाजी घेण्याचा निर्णय घेतला. त्रिपुरा बिनबाद ३९ धावा असताना सातव्या षटकात पावसाने हजेरी लावली. पावसाने विश्रांती न घेतल्याने सामना थांबवून दोघंही संघाला प्रत्येकी एक गुण देण्यात आला. यानंतर दुपारी पश्चिम बंगाल विरूद्ध महाराष्ट्र यांच्यात अंतिम सामना रंगला. महाराष्ट्र संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बंगालच्या मिता पॉल ३५ धावा व कशिश अग्रवाल १९ या सलामीच्या खेळाडूंनी चांगली सुरवात करून दिली. मात्र मधल्या फळीतील फलंदाजी कोळमडल्याने निर्धारीत २० षटकात सर्वबाद १०९ धावा बंगालला करता आल्यात. महाराष्ट्राकडून उत्कृष्ट गोलंदाजी मुक्ता मगरे हिने केली. तिने ४ षटकात ४ विकेट घेऊन बंगालचे कंबरडे मोडले. तिला अनुजा पाटील, ईशिता खळे, आदित्य गायकवाड प्रत्येकी १ विकेट साथ मिळाली. प्रत्युत्तरात महाराष्ट्र संघाची सुरवात धडाकेबाज झाली.

Share post
Tags: #Jain Irrigation Systems Ltd.#Jain Sports Academy#Maharashtra Cricket Association
Previous Post

भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे साहित्य-कला पुरस्कार जाहिर

Next Post

महात्मा गांधीजींचे नेतृत्व म्हणजे मानवी सभ्यतेचे भविष्य – डॉ. के. बी. पाटील

Next Post
महात्मा गांधीजींचे नेतृत्व म्हणजे मानवी सभ्यतेचे भविष्य – डॉ. के. बी. पाटील

महात्मा गांधीजींचे नेतृत्व म्हणजे मानवी सभ्यतेचे भविष्य - डॉ. के. बी. पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group