जळगाव – आर्य मल्टीपर्पज फाउंडेशन प्रायोजित आणि स्वर्गीय अविनाश दामले सर यांच्या स्मृती प्रित्यर्थ व जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन अधिकृत व जैन स्पोर्ट्स अकॅडमी द्वारे आयोजित जळगाव ओपन बॅडमिंटन स्पर्धा २०२३ यशस्वीरित्या पार पडल्या या स्पर्धा दिनांक १५ ते १७ सप्टेंबर २०२३ दरम्यान जळगाव जिल्हा क्रीडा संघाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये घेण्यात आल्या होत्या या स्पर्धांमध्ये अनुक्रमे ११, १३, १५, १७, १९, वर्षे वयोगटातील मुले व मुली एकेरी व १५, १७, १९ मुले व मुली दुहेरी व मिश्र दुहेरी, तसेच पुरुष आणि महिला खुला गट व ३५+ वर्षांवरील पुरुष आणि महिला एकेरी, दुहेरी व मिश्र दुहेरी या सर्व गटांचा समावेश होता.
या स्पर्धेमध्ये जळगाव, चाळीसगाव, भुसावळ, पाचोरा, भडगाव, चोपडा, दोंडाईचा, धुळे, अकोला, बुलढाणा, खामगाव, मालेगाव, अमरावती या शहरा मधून २२४ खेळाडूंचा सहभाग नोंदविला होता. स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव जिल्हा क्रिडा संघ चे अध्यक्ष श्री रजनीकांत कोठारी जी व आर्य मल्टीपर्पज फाउंडेशन चे फाउंडर मेंबर श्री मनोज आडवाणी जी, शिल्पा इलेक्ट्रॉनिक्स व फर्निचर चे श्री राजकुमार मुनोत, श्यामली मॅट्रेस चे श्री चंद्रकांत चौधरी व जळगाव जिल्ह्याचे पहिले आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू श्री सुनिल रोकडे तसेच जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव श्री विनीत जोशी, सहसचिव श्री तनुज शर्मा, सदस्य श्री शेखर जाखेटे व मुख्य पंच श्रीमती चेतना शाह उपस्थित होते. प्रमुख पाहुणे व मान्यवर अतिथींचा स्वागत कीर्ती मुनोत, अतुल देशपांडे, वलीद शेख, सुफियान शेख, साद मलिक, दीपिका ठाकूर , अतुल ठाकूर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला. तसेच मान्यवरांच्या हस्ते विजयी, उपविजयी व उत्तेनार्थ खेळाडूंना बक्षीस म्हणून रू.८५०००/- चे रोख रक्कम, मेडल, प्रमाणपत्र व श्यामली मॅट्रेस कडून गिफ्ट देण्यात आले.