जळगाव – येथील पायल संगीत नृत्यालयातर्फे रविवार दि. १७ सप्टेंबर रोजी गोकुळाष्टमीचे औचित्य साधून ‘कृष्ण आराधना’ या गायन – वादन व कथ्थक नृत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
गणपती नगरातील रोटरी क्लब हॉलमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमात हितैष्णा संजय पवार यांच्यासह पायल संगीत नृत्यालयातील विद्यार्थिंनीं गायन, वादन व नृत्याद्वारे कृष्णलिलेचे प्रसंग सादर करणार आहेत. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कल्पेश शहा, भुवनेश्वर सिंह, ज्येष्ठ पत्रकार अविनाश चव्हाण, रमासिंह, योगेश शुक्ल, कृष्णा पवार आदींची उपस्थिती असणार आहे. रसिकांनी कृष्ण आराधना या कार्यक्रमाला उपस्थित राहून, कलास्वाद घ्यावा, असे आवाहन पायल संगीत नृत्यालयाचे संचालक संजय भीमराव पवार यांनी केले आहे.