जळगाव – लखनऊ येथे नुकतेच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील १९ व्या जागतिक शांतता आणि एकता उत्सव मकॉनफ्लूएंस २०२३ मध्ये जळगावच्या किड्स गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलने डंका वाजवला आहे. उत्सवातील विविध स्पर्धेत सहभागी झालेल्या २० विद्यार्थ्यांच्या संघाने तब्बल ७ स्पर्धेत ८ बक्षिसे पटकावली आहेत. विजयी संघ सर्वोत्कृष्ट विजेतेपदाची ट्रॉफी घेऊन जळगावात पोहचताच त्यांचे शाळा व्यवस्थापन व पालकांतर्फे जंगी स्वागत करण्यात आले.
जगातील सगळ्यात मोठी शाळा म्हणून नावाजलेली लखनऊ येथील सिटी मॉंटेसरी स्कूलतर्फे दि. ३० ऑगस्ट ते २ सप्टेंबर दरम्यान डब्ल्यूयूसीसी ऑडिटोरियम लखनऊ येथे १९ व्या जागतिक शांतता आणि एकता उत्सव कॉनफ्लूएंस २०२३ चे आयोजन करण्यात आले होते. देशविदेशातील अनेक आमंत्रित शाळा स्पर्धेत सहभागी होत असतात. जळगावातील किड्स गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलने देखील स्पर्धेत सहभाग घेतला होता. शाळेतील २० विद्यार्थ्यांच्या चमूने उत्सवात सहभागी होत विविध स्पर्धेत भाग घेतला. उत्सवात आर्टसी लेन्समध्ये प्रथम, जाहिरात स्ट्रीटमध्ये प्रथम, ब्रेन-ओ-थॉनमध्ये प्रथम आणि तृतीय, नृत्यात द्वितीय, नाटकात द्वितीय, कोलाज मेकिंग मध्ये द्वितीय, पोस्टर मेकिंग स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला. स्पर्धेचे सर्वोत्कृष्ट विजेते आणि वरिष्ठ गट विजेतेपद देखील किड्स गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलच्या संघाने पटकावले.
असा आहे विजयी संघ
विजयी संघामध्ये १० वी चे प्रणव जैन, अनुष्का गांधी, तनीश जैन, कार्तिक सैदांणे, दर्शना जैन, ज्ञानेश मानकरे, पार्थ दौलतानी, ९ वी चे पार्थ झंवर, पलक झंवर, सिध्दांत शिरसाळे, अदिती मुथा, सोहा मेश्री व निशिका आसावा ८ वी चे किमया कावडीया, आरव शाह, जिया मर्चंट, गार्गी मिश्रा, सानिका भंसाली, मोक्ष जैन, व मयुराक्षी शर्मा या विद्यार्थ्याचा समावेश होता. विजयी संघाने, शाळेचे अध्यक्ष आदेश ललवाणी, मुख्याध्यापिका मीनल जैन, संचालिका हर्षिता ललवाणी यांच्या मार्गदर्शनाखाली हे यश संपादन केले. संघाला उपमुख्याध्यापिका ममता खोना, कृती जैन, मिलन साळवी, राखी गौर, हेलेना शेफर्ड, शालीनी मेहता, मोहन गोमासे, रचना महाजन, हर्षदा दुसाने, स्वाती महाजन, दिपक नेवे, योगेश मर्दाने, नरेश रायसिघांनी अशोक नेरकर, भुषण शिंपी, महेंद्र तायडे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.