जळगाव – येथील सैनिकी मुलांचे मुलींचे वसतीगृहात प्रत्येकी ४८ मुलांची राहण्याची व्यवस्था आहे. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात जे माजी सैनिक / विधवा जळगाव शहराच्या बाहेर राहतात व त्यांचे पाल्य जळगाव येथे उच्च शिक्षण घेत आहेत. त्यांच्या पाल्यांना या वसतीगृहात प्रवेश दिला जातो. माजी सैनिकांच्या पाल्यांना अती अल्प दरात सैन्याच्या रँक प्रमाणे भोजनखर्च आकारले जाते व विधवांच्या पाल्यांना सदर वसतीगृहामध्ये विनामुल्य प्रवेश देण्यात येतो. प्रवेश जागा शिल्लक राहिल्यास इतर नागरीक पाल्यांना नियमानुसार प्रवेश दिला जाईल. प्रवेशासाठी प्रवेश पुस्तीका / अर्ज वसतीगृह अधिक्षक / अधिक्षीका व कार्यालयामध्ये उपलब्ध आहेत.
तरी इच्छुक माजी सैनिक/ विधवांच्या पाल्यांनी वसतीगृहामध्ये प्रवेश घेण्यासाठी संबंधित अधिक्षक/अधिक्षिका यांचेकडून प्रवेश पुस्तीका / अर्ज खरेदी करुन आपला अर्ज त्यांचेकडे दिनांक १० जुलै, २०२३ पर्यंत सादर करावा. असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी रविंद्र भारदे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी शासकीय वसतीगृह अधिक्षक श्री. भिमराव पाटील मो. नं. ९४२१६१३५४३ व दुरध्वनी क्र. ०२५७-२२३३०८८
वसतीगृह अधिक्षीका श्रीमती अनिता पाटील मो. नं. ८७८८२४५२८२ किंवा दूरध्वनी क्र. ०२५७ -२२४१४१४ वर संपर्क साधावा. असेही जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.