जळगाव – जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन व जैन स्पोर्ट्स ॲकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड जळगाव प्रायोजित जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२३ चे उद्घाटन दि. ०९ जून २०२३ रोजी खासदार उन्मेश पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.
या स्पर्धा जळगाव जिल्हा क्रीडा संघाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये घेण्यात येत आहेत या स्पर्धांमध्ये अनुक्रमे ११, १३, १५, १७, १९, वर्षे वयोगटातील मुले व मुली एकेरी व १५, १७, १९ मुले व मुली दुहेरी व मिश्र दुहेरी, तसेच पुरुष आणि महिला खुला गट व ३५+ वर्षांवरील पुरुष आणि महिला एकेरी, दुहेरी व मिश्र दुहेरी या सर्व गटांचा समावेश आहे.
या स्पर्धेमध्ये जळगाव, चाळीसगाव, भुसावळ, जामनेर, एरंडोल, पाचोरा, भडगाव, वरणगाव व चोपडा या तालुक्यांमधून १९० खेळाडूंचा सहभाग आहे.
खा. उन्मेष पाटील यांनी सर्व खेळाडूंना मार्गदर्शन केले व पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेसाठी आलेल्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन व सचिव विनीत जोशी यांनी केले.
या स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जैन स्पोर्ट्स ॲकॅडमी चे क्रीडा समन्वयक अरविंद देशपांडे, रवींद्र धर्माधिकारी व प्रशिक्षक किशोर सिंह आणि सहकारी जाजीब शेख, गीता पंडित, करण पाटील, रोनक चांडक, तेजम केशव, अतुल ठाकूर, आयशा खान, तसेच स्पर्धेचे मुख्य पंच म्हणून श्रीमती चेतना शहा व पंच म्हणून देवेंद्र कोळी, भुषण पाटील, योगेश टोंगले, दर्शन गवळी यांनी काम पाहिले.