Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

शेतीच्या त्यागापेक्षा शाश्वत शेतीची कास धरा – नादिर गोदरेज

जैन हिल्स येथे फालीच्या पहिल्या टप्प्याचा समारोप

by Divya Jalgaon Team
June 6, 2023
in कृषी विषयी, जळगाव
0
शेतीच्या त्यागापेक्षा शाश्वत शेतीची कास धरा – नादिर गोदरेज

जळगाव दि.२ प्रतिनिधी : – शेतीचे भवितव्य संकटात येते तेव्हा भूमिपुत्रच शेतीला विकतो हे वास्तव आहे. मात्र आधुनिक तंत्रज्ञान शेतीत वापरले तर ती शाश्वत होते. भारताच्या समृद्धीचे कणखर नायक तुम्ही आहात. ठिबक, शेडनेट व इतर संशोधनाची मदत घेऊन शाश्वत शेतीची कास धरली तर शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल आणि उज्ज्वल भारत घडेल असे प्रतिपादन गोदरेज उद्योग समूहाचे अध्यक्ष नादिर गोदरेज यांनी केले.

जैन हिल्स येथे फ्युचर अॅग्रीकल्चर लीडर्स ऑफ इंडिया (फाली) उपक्रमांतर्गत पहिल्या टप्प्याच्या समारोप प्रसंगी विद्यार्थ्यांशी त्यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी व्यासपीठावर फालीच्या संचालिका नॅन्सी बॅरी, निमित दोशी, दिलीप कुलकर्णी, रवींद्र पाटील, अमोल कदम, सुरज पानपत्ते, मुनेष सक्सेना, जितेंद्र गोरडे, इमरान खान, अशोक पटनायक, बळवंत धोंगडे, जिग्न्यासा कुर्लपकर, शैलेंद्र सिंह, डॉ. बी. के. यादव, डॉ. अनिल ढाके, डॉ. आर. एस. मसळी, डोमेनिक फर्नांडीस, आशीष गणपुले, अजय शेठ, शशीकांत हांडोरे हे प्रायोजक कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते या मान्यवरांच्या हस्ते विजयी स्पर्धेकांच्या ट्रॉफी, मेडल देऊन गौरव करण्यात आला.

गुजरात, महाराष्ट्रातील 155 शाळांमधील 1085 शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तीन सत्रांत हा उपक्रम होणार आहे. यंदाचे हे ननवे वर्ष आहे. गुरुवारी (ता.1) पहिले सत्र सुरू झाले. शुक्रवारी (ता.2) विविध कृषी व्यवसाय व यंत्रांचे सादरीकरण जैन हिल्स येथे झाले केले. कृषी व्यवसायाबाबत 61 प्रतिमाने तर 61 कृषी यंत्रही विद्यार्थ्यांनी सादर केले. पारितोषिक वितरण समारंभावेळी कंपनी प्रतिनिधी यांनी मनोगत व्यक्त केले. फालीमधील यशस्वी झालेल्या १० विद्यार्थ्यांना प्रायोजक कंपनांतर्फे शिष्यवृत्ती व व्यवसाय वृद्धीसाठी आर्थिक मदत देण्यात आली.

त्यात गोदरेज अॅग्रोवेटने विशाल माळी (नाशिक), रोहन रानवारे (पुणे), जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. ने लोकेश देसले (नंदुरबार), अक्षय चांदुरकर (नागपूर), यूपीएल ने शिवांजली पवार (नंदुरबार), विवेक वरूळे (कोल्हापूर), ओमनीवर ने रागिनी फरकाळे (नागपूर), ईश्वरी बोडके (नाशिक), रॅलीस इंडिया ने श्रद्धा शिरके (सातारा), स्नेहा शिंगाडे (कोल्हापूर) यांच्यापैकी तिघांनी प्रातिनीधीक स्वरूपात मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्ष नौटीयाल, रोहिणी घाटगे यांनी केले. नॅन्सी बेरी यांनी आभार मानले.
बिझनेस प्लॅन सादरीकरण स्पर्धेत पहिल्या पाच क्रमांकाचे स्पर्धक पुढीप्रमाणे –
फिंगर मिलेट प्रॉडक्ट, हिरकणी विद्यालय गावडेवाडी जिल्हा पुणे (प्रथम क्रमांक), इंडियन गोसबेरी सेलेब्रशन, कुलस्वामिनी केंद्रीय विद्यालय हिवरे जि. पुणे (द्वितीय), राजगिरा चिक्की, श्री. पंढरीनाथ विद्यालय पोखरी पुणे (तृतीय), ऑरेंज बायप्रॉडक्ट, जिजामाता हायस्कूल आणि जूनियर कॉलेज खपा जि. नागपूर (चौथा क्रमांक) आणि पाचवा क्रमांक टमरीन बायप्रॉडक्ट, प्रकाश हायस्कूल मालेगाव जि. नागपूर

Share post
Tags: #FaliJain Hillsjain irrigation
Previous Post

पाणीपुरी विक्रेत्याची मुलगी कु. रागिणी ९५.२० टक्के गुणांसह अनुभूतीत प्रथम

Next Post

शेतीचे बाळकडू विद्यार्थ्यांना शिक्षणासह द्या

Next Post
शेतीचे बाळकडू विद्यार्थ्यांना शिक्षणासह द्या

शेतीचे बाळकडू विद्यार्थ्यांना शिक्षणासह द्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group