जळगाव दि. २८ प्रतिनिधी – जैन हिल्स येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय फलोद्यान परिषदेमध्ये चाई (कॉन्फेडरेशन ऑफ हॉर्टीकल्चरल असोसिएशन ऑफ इंडिया) ची ११ व्या वार्षिक सर्वसाधारण परिषद झाली. ११ विविध पुरस्कारांनी देशभरातील प्रगतीशील शेतकरी, शास्त्रज्ञ, अभ्यासक, संस्था व कृषि विद्यापिठांचे विभागप्रमुखांचा सन्मान करण्यात आला.
जैन हिल्स येथील परिश्रम सभागृहामध्ये झालेल्या पुरस्कार सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून केंद्र सरकारच्या कृषी विभागाचे अतिरीक्त सचिव व डबलींग फार्मर इनकम समीतीचे अध्यक्ष डॉ. अशोक दलवाई, चाई (कॉन्फेडरेशन ऑफ हॉर्टीकल्चर असोसिएशन ऑफ इंडिया) चे अध्यक्ष डॉ. एच. पी. सिंग, डाॕ. विशाल नाथ, डाॕ. हर्षवर्धन, डॉ. जे. एच. परिहार, डॉ. पी. रतमन, शिमला सीपीआरआयचे माजी संचालक डाॕ.बिरपाल सिंग, जैन इरिगेशन सिस्टीम लि.चे डॉ. के. बी. पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रास्तविक डॉ. हर्षवर्धन यांनी केले. चाई च्या कार्याविषयी डाॕ. विशाल नाथ यांनी सांगितले.
पुरस्कार व पुरस्कारार्थी असे पुढीलप्रमाणे : –
१) चाइ – डॉ. आर. एस. परोडा पुरस्काराने डॉ. तुषार कांती बेहेरा, संचालक, आयसीएआर-आयआयव्हीआर, जाखिनी (वाराणसी, युपी)
२) चाइ – डॉ. बी. एच. जैन पुरस्काराने डॉ. ए. व्ही. ढाके, वरिष्ठ शास्त्रज्ञ, जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमीटेड
४) चाइ – कौटिल्य लोकनिती पुरस्कार-२०२३ ने डॉ. सुधीर जगन्नाथ भोंगळे
५) चाइ – अचिव्हर्स पुरस्कार-२०२३ ने प्रो. अरविंद कुमार, माजी कुलगुरु, आरएलबीसीएयु (झाशी, युपी), डॉ. ए. के. सिंग, कुलगुरु, आरएलबीसीएयु (झाशी, युपी), डॉ. डी. आर. सिंग, कुलगुरु, बीएयु (साबोर, भागलपूर, बिहार), डॉ. मेजर सिंग, सदस्य, एएसआरबी, डेअर, एमओएएफडब्ल्यू (नवी दिल्ली) डॉ. के. व्ही. प्रसाद, संचालक, आयसीएआर-डायरेक्टोरेट ऑफ फ्लॉरीकल्चरल रिसर्च (पुणे), डॉ. कंचेरला सुरेश, संचालक, आयसीएआर-इंडियन इन्स्टीटयूट ऑफ ऑइल पाम रिसर्च (आंध्र प्रदेश), डॉ. ब्रजेश सिंग, संचालक, आयसीएआर-सीपीआरआय (शिमला, एचपी) डॉ. जी. बायजू, संचालक, आयसीएआर-सीटीसीआरआय (थिरुवनंतपूर, केरळ), डॉ. विजय महाजन, संचालक, आयसीएआर-डीओजीआर, राजगुरुनगर (पुणे), डॉ. मनिश दास, संचालक आणि प्रकल्प समन्वयक, आयसीएआर-डीएमएपीआर बोरीआवी (आनंद, गुजराथ)
६) चाइ – अॅप्रेसिएशन पुरस्काराने डॉ. राम अवध राम, माजी मुख्य शास्त्रज्ञ, सीआयएसएच, रेहमानखेरा (लखनौ, युपी), डॉ. दयाराम, माजी प्रमुख, मायकोलॉजी विभाग, डीआरपीसीएयु (पुसा, बिहार)
७) चाइ – जेआयएसएल फेलोशीप पुरस्काराने डॉ. एच. उषा नंदिनी देवी, असोसिएट प्रोफेसर, टीएनएयु (कोइंबतोर, तामिळनाडू)
८) चाइ – डॉ. रे बेस्ट डेझर्टेशन पुरस्काराने डॉ. सुमेरसिंग पाटील, केबीसी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (जळगाव) यांचा त्यांनी आंब्याच्या फुलांसंबंधी जीन्सचा अभ्यास केल्याने सन्मान करण्यात आला. तर डॉ. रवी. वाय. शास्त्रज्ञ, आयसीएआर-एनआरसी ऑन सीड स्पाईसेस (अजनेर, राजस्थान)
९) चाइ – डॉ. क्रीती सिंग बेस्ट पेपर पुरस्काराने दलासनुरु चंद्रेगौडा, मंजुनाथा गौडा, विजय महाजन, राम दत्ता, कृषी शास्त्रज्ञ निवड बोर्डाचे सदस्य डॉ. मेजर सिंग यांनी “कांद्याच्या गठ्ठ्यावरील सीएमएस-एस मेल-स्टराइल सायटोप्लाझम चे संशोधन केले त्यामुळे त्यांचा सन्मान करण्यात आला.
१०) चाइ – इन्स्टीटयूशनल फेलो पुरस्कार-२०२३ हा नॅशनल हॉर्टिकल्चरल रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट फाऊंडेशन (एनएचआरडीएफ), नवी दिल्ली., महाराणा प्रताप युनिव्हर्सिटी ऑफ अॅग्रीकल्चर अॅण्ड टेक्नोलॉजी (उदयपूर, राजस्थान), मे. निर्मल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड, पाचोरा जि. जळगाव,