जळगाव, दि. २७ (प्रतिनिधी) – नवीदिल्ली येथील अमितसिंग मेमोरियल फाउंडेशन व जैन इरिगेशन सिस्टिम्स् लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने २८ ते ३० मे दरम्यान जैन हिल्स येथे राष्ट्रीय फलोद्यान परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवस होणाऱ्या परिषदेमध्ये 11 सत्रात असून जवळपास 100 शास्त्रज्ञ आपले शोधनिबंध सादर करतील.
जैन हिल्स येथे होणाऱ्या या परिषदेचे उद्घाटन कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एल. माहेश्वरी, दिल्लीच्या एएसआरबीचे सदस्य डॉ. मेजर सिंग, माजी सचिव सुरजित चौधरी, ईस्त्राईलचे आंतरराष्ट्रीय सिंचनतज्ज्ञ अॅम्नोन ऑफेन, चाईचे चेअरमन डॉ. एच. पी. सिंग, जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन, दिल्ली येथील एनआरएएचे सीईओ डॉ. अशोक दलवाई, झारखंडच्या आयसीएआर-आयएआरआयचे डॉ. विशाल नाथ, माजी सचिव सुरजीत चौधरी यांच्या उपस्थित होणार आहे.
फलोद्यान म्हणजे विविध फळ पिकावर व भाजीपाला व अन्नधान्य उत्पादनाव वातावरण बदलाचा होणारा परिणाम त्यावर मात करण्यासाठी विविध तंत्रज्ञान क्रॉप कुलींग, टर्मिनल हिट मॅनेजमेंट, अल्ट्रा हायडेन्सिटी,अचूक पाणी व अन्नद्रव्य व्यवस्थापन अशा विविध विषयावर शोधनिबंध सादर करतील. यातून शेतकऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची उपयुक्ता यावर विचारमंथन केले जाणार आहे. याच परिषदे दरम्यान ‘केळीवरील रोगराई व्यवस्थापन व बटाट्याचे गुणवत्तापूर्ण बियाणे निर्मिती’ या दोन विषयावर २९ मे रोजी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजनसुद्धा करण्यात आले आहे.
या परिषदेमध्ये एकूण ११ सत्र असून जवळपास १०० शास्त्रज्ञ आपले शोधनिबंध सादर करणार आहेत. देशभरातील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे संचालक व शास्त्रज्ञ, देशातील विविध कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ यांचा सहभाग असणार आहे. या परिषदेमध्ये काही विद्यापीठांचे कुलगुरू व माजी कुलगुरू देखील उपस्थित असतील. २८ मे रोजी (Confederation of Horticulture Associations of India) CHAI ‘चाई’चे पुरस्कार दिले जाणार आहेत. याच श्रुंखलेत ३० मे रोजी ‘उद्यान रत्न’ पुरस्कारांचे वितरण देखील करण्यात येणार आहेत. संबंधीत सर्वांनी या परिषदेचा लाभ घ्यावा आणि आपली उपस्थिती नोंदवावी यासाठी 9422774943 व 9422776925 या क्रमांकावर संपर्क साधावा.