Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

जैन स्पोर्टस् अॅकडमीच्या ‘समर कॅम्प-२०२३’चा समारोप

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळांडूचा केला गौरव

by Divya Jalgaon Team
May 26, 2023
in क्रीडा, जळगाव
0
जैन स्पोर्टस् अॅकडमीच्या ‘समर कॅम्प-२०२३’चा समारोप

जळगाव दि. १५ प्रतिनिधी – जैन स्पोर्टस् अॅकडमीतर्फे १६ एप्रिल ते १४ मे दरम्यान ‘समर कॅम्प-२०२३’चे आयोजन करण्यात आले होते. त्याचा समारोप समारंभ विद्या इंग्लीश मिडीअम स्कूलच्यामागे असलेल्या क्रीडांगणावर झाला. यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा क्रीडा साहित्य व चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

याप्रसंगी व्यासपीठावर धर्मदाय आयुक्त कार्यालयाचे अधिक्षक व्ही. एन. तायडे, जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष एस. टी. खैरनार, अनुभूती निवासी स्कूलचे प्राचार्य देबासिस दास, जळगाव जिल्हा बुद्धिबळ असोसिएशनचे सचिव नंदलाल गादिया, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे डॉ. अश्विन झाला, जैन इरिगेशनचे अनिल जोशी उपस्थित होते.

उन्हाळी प्रशिक्षणाचा आढावा मुख्य प्रशिक्षक सुयश बुरकूल यांनी सांगितला. प्रास्ताविक व सूत्रसंचालन वरूण देशपांडे यांनी केले. आभार अजित घारगे यांनी मानले. बॅडमेंटनचे सहप्रशिक्षक गीता पंडीत यांनी मनोगत व्यक्त केले. खेळाडूंना शुभेच्छा देताना नंदलाल गादिया यांनी जैन स्पोर्टस् अॅकडमीच्या उन्हाळी प्रशिक्षण शिबीर हे शारिरीक, मानसिक आरोग्य सांभाळत पाल्यांचा सर्वांगिण विकास करणारे ठरले. यातूनच राज्य, राष्ट्रीयस्तरावरील खेळाडू आपला विकास करून शकतात. खेळ, खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी श्री. अशोक जैन, श्री. अतुल जैन सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याने त्यांचेही आभार नंदलाल गादिया यांनी मानले.

डॉ. अश्विन झाला यांनी जैन स्पोर्टस् अॅकडमी विविध क्रीडा प्रकारांत हे खेळाडूंमध्ये आत्मविश्वास, निर्णयक्षमता आणि आरोग्यासंबधी जागृतता आणत असून यातूनच राष्ट्रनिर्माणाचे कार्य घडत आहे. अध्यक्षीय मनोगत प्राचार्य देबासिस दास यांनी व्यक्त केले. जळगावसारख्या शहरात श्री. अतुल जैन यांच्यासारख्या क्रीडाप्रेमीमुळे अनुभूती निवासी स्कूल येथे खेळासाठी आवश्यक असलेल्या उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्यात. त्यामुळे खेळाकडे विद्यार्थी करिअरच्यादृष्टीने बघत असल्याचेही देबासिस दास म्हणाले.

जैन स्पोर्टस अॅकडमीतर्फे केवळ उन्हाळी शिबीरार्थींचा नव्हे तर विविध क्रीडाप्रकारांमध्ये राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षक व खेळाडूंचा गौरव करण्यात आला. यामध्ये निलम घोडगे, अभिजीत त्रिपणकर, वाल्मिक पाटील, कांचन चौधरी, अजित घारगे, पुष्पक महाजन, प्रविण ठाकरे, शुभम शर्मा, तनेश जैन, किशोरसिंग सिसोदिया, शशांक अत्तरदे, ओम मुंढे, शुभम पाटील, योगेश्वरी धोंगडे, मनिषा हटकर, क्रिष्णा हटकर, प्रणव भोई, निलेश पाटील, श्रेयांक खेकरे, सरीपट्टा घेटे, निकेतन खोडके, रोहन अवधूत, महिमा पाटील, शितील रूढे, निशा अवधूत, तेजस्वीनी श्रीखंडे, सायली कुलकर्णी, रिषभ कारवा, सिद्धेश देशमूख, नचिकेत ठाकूर, तुलजेस पाटील, तन्वीर अहमद, सोनल हटकर, साक्षी पाटील, गौरी साळूंखे, आयशा साजीद खान, मिताली पाठक, फरहीन खान, पुष्करणी भट्टड, वरूण देशपांडे, घनशाम चौधरी, राहुल निभोंरे, उदय सोनवणे, पंकज पवार, योगेश धोंगडे, अनिल मुंढे, रहिम खान, निलम अन्सारी, सय्यद मोहसीन यांचा समावेश होता. दरम्यान जैन स्पोर्टस् अॅकडमीचे अध्यक्ष अतुल जैन यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सर्वाच्च समितीत निवडून आल्याने त्यांचाही विशेष गौरव करण्यात आला.

Share post
Tags: #Gandhi Research Foundation#Jain Sports Academy#The athletes were felicitated by the dignitaries by giving sports materials and trophies#खेळांडूचा गौरव
Previous Post

एश्वर्य नितीन चोपडा ला वाणिज्य शाखेत ९७ टक्के

Next Post

जैन इरिगेशनचे चौथी तिमाही व ३१ मार्च २०२३ला आर्थिक निकाल जाहीर 

Next Post
जैन इरिगेशनचे चौथी तिमाही व ३१ मार्च २०२३ला आर्थिक निकाल जाहीर 

जैन इरिगेशनचे चौथी तिमाही व ३१ मार्च २०२३ला आर्थिक निकाल जाहीर 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group