Monday, March 30, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

बुलढाण्याच्या इतिहासात पहिल्यांदा फिडे मानांकन राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन

by Divya Jalgaon Team
April 19, 2023
in क्रीडा, जळगाव
0
बुलढाण्याच्या इतिहासात पहिल्यांदा फिडे मानांकन राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन

बुलढाना – येथील बुलढाणा जिल्ह्य चेस सर्कल,  बुलढाणा अर्बन तथा सहकार विद्या मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने बुलढाण्यात फिडे मानांकन राज्यस्तरीय अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.  सदर स्पर्धा ही 14 एप्रिल ते 16 एप्रिल दरम्यान सहकार विद्या मंदिर सभागृह येथे घेण्यात येणार आहे.  अशी माहिती बुलढाणा अर्बनचे सीएमडी तथा आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. सुकेश झंवर यांनी आज घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

ही पत्रकार परिषद बुलढाणा रेसिडेन्सी येथे 4 एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता घेण्यात आली.पुढे माहिती देतांना डॉ. झंवर म्हणाले की,  बुलढाण्यात होणारी राज्य अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा 2023,  ही स्पर्धा बुलढाणा  व  ग्रामीण परिसरातील खेळाडूंना वाव मिळावा, प्रतिभावान  खेळाडूंना राष्ट्रीय पातळीवर सहज जाता यावे या उद्देशातून ठेवण्यात आलेली आहे.  सदर स्पर्धा ही अंडर 17 गटासाठी ठेवण्यात आलेली आहे.

या स्पर्धेकरिता प्रत्येक जिल्ह्यातून खेळाडूंची निवड होऊन दोन युवक  व  दोन युवती अशा खेळाडूंना या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी केले जाणार आहे.  या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंची जन्मतारीख ही 01 जानेवारी 2006 च्या नंतरची असने आवश्यक आहे.  या स्पर्धेचे समितीचे अध्यक्षपदी डॉ सुकेश झंवर यांची निवड करण्यात आलेली आहे तर समितीच्या सचिव पदी अंकुश रक्ताडे (सहसचिव महाराष्ट्र बुध्दिबळ संघटना) यांची निवड करण्यात आलेली आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक खेळाडूंना प्रमाणपत्र व विजेत्या खेळाडूंना रोख बक्षीस, ट्रॉफी व प्रमाणपत्र दिली  जाणार आहे.

सदर स्पर्धेकरिता एकूण बक्षीस रोख रक्कम 36 हजार  ठेवण्यात आलेली आहे.  या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंची राहण्याची मोफत व्यवस्था करण्यात आलेली आहे, तर जेवणाची व्यवस्था आयोजकाच्या वतीने नाममात्र शुल्कात करण्यात आलेली आहे.  तर खेळाडू सोबत येणाऱ्या पालकांना अतिशय माफक दरात राहण्याची जेवणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामध्ये सकाळच्या चहा,  नाश्ता ,दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण याचा ही समावेश करण्यात आला आहे.

सदर स्पर्धा ही आठ फेऱ्यांमध्ये घेण्यात येणार आहे. प्रत्येक फेरी ही  60 मिनिट 30 सेकंद इनक्रीमेंट असणार आहे. सदरची स्पर्धा स्विस लिग पध्दतीने घेण्यात येणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन 14 एप्रिल ला सकाळी दहा वाजता केले जाणार आहे तर बक्षीस वितरण 16 एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता केले जाणार आहे तसेच इतर महितीकरिता ९४०५७७७७८४ वर संपर्क साधावा.स्पर्धेचा लाभ जास्तीत जास्त खेळाडूंनी घ्यावा असे आवाहन आयोजकाच्या वतीने करण्यात आलेले आहे.

 ग्रँडमास्टर करणार मार्गदर्शन…
बुलढाण्यात घेण्यात येणाऱ्या या राज्यस्तरीय राज्य अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेसाठी मार्गदर्शन व मुख्य आकर्षण म्हणून ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे,  ग्रँडमास्टर स्वप्निल धोपाडे हे असणार आहे. तर या स्पर्धेकरीता अखिल भारतीय बुद्धिबळ फेडरेशनचे सल्लागार अशोक जैन तसेच महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष परिणय फुके , महाराष्ट्र बुद्धीबळ संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष सिद्धार्थ मयूर, स्पर्धेचे मुख्य पंच म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावरील पंच म्हणून कामगिरी केलेले प्रवीण ठाकरे यांना आमंत्रित करण्यात आलेले आहे.  सदर स्पर्धेकरिता महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव यांना देखील आमंत्रित करण्यात आलेले आहे.

राष्ट्रीय स्पर्धेसाठी होणार खेळाडूंची निवड…
राज्यस्तरीय बुलढाणा येथे होत असलेल्या राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या विजेत्या खेळाडूंची निवड ही राष्ट्रीय स्पर्धेसाठी केली जाणार आहे. सदर स्पर्धा ही मे महिन्यात 01 ते 09 मे दरम्यान पंजाब मध्ये घेतली जाणार आहे.

Share post
Tags: # Buldhana District Chase Circle#Dr. Sukesh Jhanwar#State Championship Chess Tournament
Previous Post

वसंतवाडी तांडा गावात विश्व बंजारा दिवस उत्साहात संपन्न

Next Post

बुलढाण्याच्या इतिहासात पहिल्यांदा फिडे मानांकन राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन..

Next Post
बुलढाण्याच्या इतिहासात पहिल्यांदा फिडे मानांकन राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन..

बुलढाण्याच्या इतिहासात पहिल्यांदा फिडे मानांकन राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group