जळगाव – जैन इरिगेशनचे वरिष्ठ सहकारी प्रविण मंडोरा यांची कन्या कु. रितू मंडोरा हिने कंपनी सेक्रेटरी सी. एस. या अभ्यासक्रमात पदवी उत्तीर्ण केली. तीन वर्षाच्या अभ्यासक्रमात प्रथम वर्षाला ती भारतातून १० व्या रॅंकने तर जळगाव, धुळे, नंदुरबार, अकोला, बुलढाणा या पाच जिल्ह्यातून पहिल्या रॅंकने उत्तीर्ण झाली होती. उज्ज्वल स्प्राउटरला १० वी पर्यंत त्यानंतर बी. कॉम बाहेती कॉलेज व सध्या एस. एस. मणियार लॉ कॉलेजला एल. एल. बी. च्या द्वितीय वर्षाला रितू मंडोरा शिक्षण घेत आहे. पुढील उच्चशिक्षणासाठी ती पुण्याला जाणार आहे.