जळगाव – गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ उल्हास पाटील होमिओपॅथी महाविद्यालयात आज फ्रेशस पार्टीचे आयोजन केले होते. याप्रसंगी नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले असून नूतन विद्यार्थ्यांनीही नृत्य, गीत गायन, कविता सादरीकरण यातून आपल्यातील कला सादर केल्या.
याप्रसंगी व्यासपीठावर गोदावरी फाऊंडेशन चे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ उल्हास पाटील, सचिव डॉ वर्षा पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे रजिस्ट्रार प्रमोद भिरुड, प्राचार्य डॉ डी बी पाटील, डॉ अमोल चोपडे, डॉ पंकज शर्मा, डॉ श्वेता डोंगरे, डॉ दिव्या, डॉ पूजा पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरी पूजन व दीप प्रज्वलन करून सुरवात झाली. गणेश वंदना तसेच नव्या जुन्या गाण्यांवर विद्यार्थ्यांनी सोलो, डूएट नृत्य सादर केले. प्रमुख अतिथी डॉ उल्हास पाटील यांनी कार्यक्रमाचे कौतुक करून होमिओपॅथी अभ्यासक्रमासाठी शुभेच्छा दिल्यात. सूत्रसंचालन मयुरी, अर्शद, झोया यांनी तर आभार सारा नुर हिने मानले.