Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

‘इंडिया अॅग्रीबिझनेस अवॉर्ड्स 2022’पुरस्काराने जैन फार्म फ्रेश फुडस् लि. चा दिल्ली येथे सन्मान

by Divya Jalgaon Team
March 4, 2023
in कृषी विषयी, जळगाव, तंत्रज्ञान
0
‘इंडिया अॅग्रीबिझनेस अवॉर्ड्स 2022’पुरस्काराने जैन फार्म फ्रेश फुडस् लि. चा दिल्ली येथे सन्मान

नवी दिल्ली – भारतीय अन्न आणि कृषी परिषद (ICFA) यांच्यावतीने 9 ते 11 नोव्हेंबर 2022 दरम्यान नवी दिल्ली येथे देशातील सर्वात मोठे कृषी संमेलन, प्रदर्शन ‘अॅग्रोवर्ल्ड 2022’ पार पडले. त्यात अन्न प्रक्रिया श्रेणी करीता जैन फार्म फ्रेश फुडस् लिमिटेडला ‘इंडिया अॅग्रीबिझनेस अवॉर्ड्स 2022’ ने सन्मान करण्यात आला. केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री डॉ. संजीव कुमार बलियान यांच्या हस्ते कंपनीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. बी.के. यादव यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

आय ए आर आय मैदान, पुसा, नवी दिल्ली येथे भव्य प्रदर्शन आयोजित कार्यक्रमात शेतकऱ्यांसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन देखील झाले. त्यात शाश्वत शेतीचे तंत्र, काढणीनंतरचे व्यवस्थापन, प्रक्रिया आणि विपणन, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कृषी परिवर्तन, शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी व्यापार, ई-कॉमर्सद्वारे शेतकर्‍यांचे सक्षमीकरण: एफपीओची भूमिका इत्यादी विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

जैन फार्म फ्रेश फुडस् लि. चे कार्य अधोरेखित करून अन्न प्रक्रिया श्रेणीमधून ‘इंडियन अॅग्रीबिझनेस अवॉर्डस् 2022’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. जगातील सर्वांत मोठ्या प्रमाणावर आंब्यावर प्रक्रिया करणारी एक नंबरची तर कांदा भाजीपाला निर्जलीकरण करणारी सर्वात मोठी कंपनी म्हणून जैन फार्म फ्रेश फुडस् लिमिटेडची ओळख आहे. या कंपनीचे वार्षिक जागतिक उत्पन्न 1600 ते 1800 कोटी रुपये आहे.

तिचे मुख्य कार्यालय जळगाव (महाराष्ट्र) येथे आहे. मागील 5 वर्षात 80000 मे. टनांहून अधिक कांदयावर प्रक्रिया केली गेली. त्यासाठी 9 जिल्हे, 31 तालुके, 435 खेडे आणि 10000 हून अधिक शेतकऱ्यांकडून करार शेतीवर माल खरेदी करून प्रक्रिया केली. कंपनीने दिलेल्या तंत्रामुळे शाश्वत शेती करता येते आणि शेतकऱ्यांची उपजिविका व ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे उत्पन्न यात सुधारणा झाली, ही सुधारणा सातत्याने होतच आहे.

जैन फार्म फ्रेश फुडस् लि. शेतकऱ्यांना कृषी तज्ज्ञांचा सल्ला, उत्तम दर्जाचे बी-बियाणे, 100 हून अधिक कृषी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन देते. शेतकऱ्यांकडून ताजे कांदे उत्तम भावात खरेदी करते. अल्पभूधारक आणि मध्यम आकाराची जमीन असलेल्या शेतकऱ्यांना भारतात जैन गॅप अंतर्गत उत्तम शेती पद्धती (Good Agriculture Practices- गॅप) हा भारतातील कृषी क्षेत्रातील पहिला उपक्रम ही कंपनी राबवते. हा उन्नती उपक्रम जे जैन फार्म फ्रेश फुडस् संयुक्तपणे शेतकऱ्यांसोबत भागीदारीत राबवते. या उपक्रमात शेतकऱ्यांना अती सघन लागवड पद्धत (Ultra High Density Plantation-युएचडीपी) शिकवली जाते.

Share post
Tags: #‘इंडिया अॅग्रीबिझनेस अवॉर्ड्स 2022#dilhi awardjain irrigationJalgaonOnion
Previous Post

“हाऊ गांधी कम्स अलाइव्ह”मध्ये संगीत कार्यशाळा संपन्न

Next Post

जैन इरिगेशनचे एकल व एकत्रित आर्थिक निकाल जाहीर

Next Post
जैन इरिगेशनचे एकल व एकत्रित आर्थिक निकाल जाहीर

जैन इरिगेशनचे एकल व एकत्रित आर्थिक निकाल जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group