जळगाव – ५६ व्या सब-ज्युनिअर आणि ज्युनिअर महाराष्ट्र राज्य कॅरम चॅम्पियनशीप स्पर्धा २०२२-२३ मुंबई-दादर येथील श्री हलारी ओसवाल समाज हॉल येथे दि. ११ जानेवारी २०२३ ला पार पडली.
या स्पर्धेत जैन स्पोर्टस् अॅकडमीची खेळाडू कु. दुर्गेश्वरी योगेश धोंगडे विजयी झाली. तिने रत्नागरीच्या निधी सप्रे हिचा ४-२५ व ५-२५ ने पराभव केला. दुर्गेश्वरी धोंगडे हिने कॅडेट ग्रुप १२ वयोगटामध्ये पहिला क्रमांक प्राप्त केला. महाराष्ट्रातून प्रथम आल्याने दुर्गेश्वरीचा चषक, प्रमाणपत्र ऑल इंडिया कॅरम फेडरेशनचे अरूण केदार यांच्याहस्ते गौरविण्यात आले.
या यशानंतर तिची राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली असून राष्ट्रीय कॅरम स्पर्धा वाराणसी येथे खेळविली जाणार आहे. दुर्गेश्वरी धोंगडे हिला प्रशिक्षक म्हणून जैन स्पोर्टस ॲकडमीतील प्रशिक्षक सय्यद मोहसीन व योगेश धोंगडे यांनी मार्गदर्शन केले. तिच्या यशाबद्दल जैन स्पोर्ट्स अॅकडमीचे अध्यक्ष अतुल जैन, प्रशासकीय अधिकारी अरविंद देशपांडे यांच्यासह सहकाऱ्यांनी कौतूक केले.