जळगाव – येथील केसीई सोसायटी संचालित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय, जळगाव येथे महाविद्यालयाच्या शालेय प्रशासन,शैक्षणिक, प्रशासकीय प्रगतीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या शिक्षकेतर कर्मचारी बंधूंच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिक्षकेतर कर्मचारी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी उपप्राचार्य, पर्यवेक्षक, समन्वयक व वरीष्ठ शिक्षकांच्या हस्ते शिक्षकेतर कर्मचारी बंधूंचा गुलाब पुष्प देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी उपप्राचार्या प्रा.के. जी.सपकाळे यांनी शिक्षकेतर कर्मचारी वर्गाच्या आजवरच्या सहकार्याबद्दल आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अतुल इंगळे यांनी व आभार प्रदर्शन प्रा.महेंद्र राठोड यांनी केले. याप्रसंगी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते.