मुक्ताईनगर (प्रतिनिधी) – संपूर्ण मुक्ताईनगर मतदारसंघ हा नाथाभाऊंचा परिवार असून मतदारसंघातील प्रत्येक व्यक्तीला त्यांनी कुटुंबातील व्यक्ती प्रमाणे वागणूक दिली आहे. त्यांच्याकडे आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे काम मार्गी लावले कोण आपला कोण परका असा कोणताही भेदभाव केला नाही. सर्व जाती धर्मातील लोकांना राजकारणात पदे दिली. अगदी सामन्यातील सामान्य व्यक्तींना त्यांनी आमदार, खासदार, सभापती, जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य सरपंच बनवले कार्यकर्त्यांसाठी जिवाचे रान केले असे प्रतिपादन रोहिणी खडसे यांनी जनसंवाद यात्रेत तांदलवाडी येथील कॉर्नर सभेत केले.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या नाथाभाऊ यांनी नेहमी विकासाचे राजकारण केले विकास कामे करताना त्यांनी कधी कोणताही भेदभाव केला नाही या परिसरातील प्रत्येक गावात कोट्यवधी रुपयांचा विकास निधी उपलब्ध करून दिला. तांदलवाडीमधील बॅक वॉटर मध्ये बाधित घरांचे पुनर्वसन करण्यासाठी जागा निश्चित झाली असली तरी प्लॉट मिळत नसल्यामुळे बधितांनी जलसमाधी आंदोलन केले त्यावर नाथाभाऊ यांनी जिल्हाधिकारी यांच्या सोबत चर्चा करून आंदोलन स्थळी जिल्हा पुनर्वसन अधिकारी भारदे तहसीलदार यांच्या सोबत भेट देऊन येत्या मार्च पर्यंत बाधित कुटुंबांना प्लॉट मिळण्याचा मार्ग मोकळा केला.
तापी काठावरील अजून काही गावांचा पुनर्वसनाचा प्रश्न आहे नाथाभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही तो सोडविण्याचा प्रयत्न करू असे रोहिणी खडसे यांनी ग्रामस्थांना आश्वासन दिले. तसेच जास्तीत जास्त संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सभासद होण्याचे त्यांनी उपस्थितांना आवाहन केले.