जळगाव – दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार, दिनांक 7 नोव्हेंबर, 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता ऑफलाईन पध्दतीने जिल्हाधिकारी सभागृहात आयोजित करण्यात आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी दिली आहे.
जनतेची गाऱ्हाणी व तक्रारी सोडविण्यासाठी जिल्हास्तरावर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार सोमवार दिनांक 7 नोव्हेंबर, 2022 रोजी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. या लोकशाही दिनी नागरिकांनी आपल्या तक्रारी लेखी स्वरुपात आणाव्यात. असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.