यावल ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील हिंगोणा येथे राहणारे गृहस्थ यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेत आपली जिवनयात्रा संपवल्याची घटना समोर आली आहे . पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की हिंगोणा तालुका यावल येथील रहिवासी बाळू उखा कोळी वय ५० वर्ष यांनी दिनांक २८ ऑक्टोबर शुक्रवार रोजी सकाळी सहा ते ७ वाजेच्या सुमारास हिंगोणा गावातील डोंगरहाळ या परीसरातील आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली बाळु कोळी हे मोल मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते त्यांनी आत्महत्या करण्याचे टोकाचे पावुल का उचलले हे मात्र स्पष्ट होवु शकले नाही. याबाबत विलास कोळी यांच्या खबर दिल्या वरून फैजपुर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे . घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे कॉ देविदास सूरदास हे कँ. बऱ्हाटे हे करीत आहे . मयत कोळी यांचे मृतदेह शवविच्छेद यावल ग्रामीण रुग्णालयात आले. बाळु कोळी यांच्या पश्चात त्यांच्या कुंटुबात पत्नी एक मुलगी असा परिवार आहे .