जळगाव – धुळे जिल्ह्यात आगामी काळात पंचायत समित्यांच्या निवडणूका होऊ घातल्या आहेत. या निवडणूका जिंकण्यासाठी काँग्रसने देखील कंबर कसली असून प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांच्या नेतृत्वाखाली रणनिती आखली जात आहे.
राज्यात येत्या काही महिन्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणूका होणार आहे. धुळे जिल्ह्यात ग्रामीण भागांचे कारभारी ठरविण्यासाठी पंचायत समित्यांच्या निवडणूका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने या निवडणूका काँग्रेस पक्षाने अंत्यंत गांभीर्याने घेतल्या असून गुरुवारी प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांनी धुळ्याचा दौरा करुन प्रमुख पदाधिकार्यांची बैठक घेतली. या बैठकीला धुळ्याचे आमदार कुणाल पाटील, धुळ्याचे माजी खासदार डी.एस. अहिरे, पंचायत समिती सभापती प्रतिभाताई सूर्यवंशी यांच्यासह पदाधिकार्यांची उपस्थिती होती.
पंचायत समित्यांच्या निवडणूका जिंकण्याच्या उद्देशानेच डॉ.उल्हास पाटील यांच्या नेतृत्वाखाली रणनिती आखण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन डॉ.उल्हास पाटील यांनी दिले आहे. तसेच कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, अशा सुचनाही डॉ.उल्हास पाटील यांनी या बैठकीत आमदार कुणाल पाटील, माजी खा.डी.एस.अहिरे यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.