जळगाव – जळगाव जिल्हा रायफल असोसिएशनचे अध्यक्ष विशन मिलवाणी यांच्या मार्गदर्शनात दोन दिवशीय खुल्या जिल्हास्तरीय रायफल शुटिंग स्पर्धेचे District Rifle Shooting Competition आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धा सर्वांसाठी खुल्या असल्याने जिल्ह्याभरातुन मोठ्या संख्येने खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे उद्घाटन डॉ.प्रदिप तळवलकर यांच्या हस्ते पिस्तोलने फायरींग करून करण्यात आले. त्यावेळी कार्यक्रमांचे अध्यक्ष विशन मिलनाची होते तर प्रमुख पाहुणे म्हणून लक्ष्मी उद्योग समुहाचे संचालक अनिल माळी तसेच मेहरूण येथील नामवंत सामाजिक कार्यकर्ते व माजी नगरसेवक सदाशिवराव सोनवणे व गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेजचे क्रीडा संचालक आसिफ सर यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्पर्धा यशस्वीतेसाठी संस्थेचे उपाध्यक्ष प्रा.यशवंत सैंदाणे,सह सचिव सुनील पालवे,राष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक पो.ह.प्रकाश गवळी, निलेश जगताप व प्रिंयका पटाईत यांनी विशेष परिश्रम घेतले.