जळगाव – ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालयात स्वर्गवासी लता मंगेशकर जयंती निमित्त वाईस ऑफ ए टू झेड रियालिटी शो या कार्यक्रमाची प्रथम फेरी घेण्यात आली.
सदर कार्यक्रमात इयत्ता पाचवी ते दहावीच्या 90 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची गाणी गाऊन भारताची गान कोकिळा लता मंगेशकर यांना आदरांजली देण्यात आली. सदर कार्यक्रमाला ए टी झांबरे माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे , तसेच पर्यवेक्षक नरेंद्र पालवे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अतुल पाटील व पराग राणे तसेच इतर शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.


