जळगाव – जातीचे प्रमाणपत्र देतांना योग्य त्या कागदपत्रांची आपण पडताळणी केली आहे किंवा कसे याबाबत अधिकाऱयांनी काळजी घेणे गरजेचे असून प्रमाणपत्र देताना अधिका-यांनी जागृत रहावे, असे आवाहन जात पडताळणी समितीचे अध्यक्ष गुलाबराव खरात यांनी येथे केले. सामाजिक न्याय विभागातर्फे जिल्हयातील संबंधीत अधिका-यांची कार्यशाळा जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती.त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त, राकेश पाटील, तसेच उपविभागीय अधिकारी राममसिंग सुलाणे, महेश सुधळकर, विनय गोसावी, श्रीमती सीमा अहिरे, लक्ष्मीकांत साताळकर, विक्रम बांदल, कैलास कडलग उपस्थित होते.
जातीचे प्रमाणपत्र देताना आपण आवश्यक ती जबाबदारी घेतली पाहीजे. जातीच्या नावा – नावांमधील साधर्म्य असताना कोणत्या कागदपत्रांची पडताळणी करणे आवश्यक आहे,तसेच एखाद्या कागदपत्रांची उपलब्धता नसतांना कोणते दाखले विचारात घ्यावेत, जातीचा उल्लेख अनेकदा शैक्षणीक कागदपत्रात नसतो त्यावेळी कोणत्या कागदपत्रांचा उपयोग करावा. यासह विविध मुद्द्यावर त्यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी सहभागी अधिकारी कर्मचा-यांनी शंकाचे निरसन करुन घेण्याचा घेतले. उपायुक्त राकेश पाटील यांनी प्रस्तावीक केले. तसेच एम. जे. महाविदयालय जळगांव येथे सन 2022-23 या वर्षात इयत्ता 11 वी 12 विज्ञान शाखेच्या विदयार्थ्यांना जात प्रमाणपत्र पडताळणी बाबत राकेश पाटील यांनी मार्गदर्शन केले.


