यावल ता. डोंगर कठोरा – येथील ग्रामपंचायत तर्फे शिक्षक दिनी शिक्षकांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी सरपंच व अरुणोदय शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ.राजेंद्रकुमार झांबरे हे होते.
प्रमुख पाहुणे सरपंच नवाज तडवी,उपसरपंच धनराज पाटील,माजी सरपंच मनोहर महाजन,ग्रा.पं.सदस्य जुम्मा तडवी,दिलीप तायडे, कल्पना राणे,आशा आढाळे, शकीला तडवी,ऐश्वर्या कोलते,शबनम तडवी, हेमलता जावळे,ग्रामविकास अधिकारी ए.टी.बगडे, केंद्रप्रमुख महंमद तडवी,प्राचार्य डॉ.दिलीप भोळे,मुख्याध्यापक नितीन झांबरे,एस.एन.वानखेडे आदी उपस्थित होते.
सुत्रसंचलन प्रवीण कुयटे तर प्रास्ताविक कल्पना राणे यांनी केले.यावेळी महिला महाविद्यालय,अ.ध.चौधरी विद्यालय व ज्यु. कॉलेज,जि. प.मराठी व उर्दू शाळा, शासकीय आश्रमशाळा, अंगणवाडी सेविका, मदतनीस या सर्वांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.मनोगत सरपंच नवाज तडवी, ग्रा.पं.सदस्य कल्पना राणे,मनोहर महाजन, दिलीप तायडे,जुम्मा तडवी तसेच एम.इ.जंजाळ,चारुलता झांबरे, हर्षाली जावळे यांनी व्यक्त केले.
यावेळी गेल्या ४० वर्षापासून डॉ.रवींद्र राणे हे शिक्षक दिनी शिक्षकांच्या उत्तम कार्याबद्दल गौरव करतात यावर्षीही त्यांनी स्मृतिचिन्ह देऊन शाळेचा सन्मान केला.अध्यक्षीय भाषणात डॉ.राजेंद्रकुमार झांबरे व मान्यवरांनी शिक्षक करीत असलेल्या चांगल्या कामाचे कौतुक केले तसेच शिक्षकांच्या उत्कृष्ट कार्याचा गुणगौरव केला.यावेळी शिक्षक,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत कार्यकारणी तसेच प्रदीप पाटील,कलेश कोल्हे,सायबु तडवी,खेमचंद पाटील यांनी परिश्रम घेतले.