जळगाव – रोझलँड इंग्लिश मिडियम हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना रंगाची माहिती अनोख्या पद्धतीने समजवून देण्यासाठी दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी कलर डे साजरा करण्यात येतो. या शुक्रवारी (दि.२६), “नर्सरी ते चौथी” या प्राथमिक व माध्यमिक वर्गात ब्ल्यू डे साजरा करण्यात आला.
यानिमित्ताने शिक्षकांनी विद्यार्थ्यांना निळ्या रंगाबद्दल माहिती दिली. तसेच त्यांनी पाण्याचे महत्त्व, नैसर्गिक संपत्ती हे विषय विद्यार्थ्यांना समजून सांगितले. पाण्याचा वापर कसा करावा याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. जलचर प्राण्यांचे मुखवटे बनवून विद्यार्थ्यांनी परिधान करुन पाहिले. ब्ल्यू डे वर गाणे म्हणत घोषणा देत विद्यार्थ्यांनी ब्ल्यू डे चा आनंद घेतला.
या कार्यक्रमासाठी वर्ग १ ली ते ४ थी च्या शिक्षकांनी परिश्रम घेतले तसेच सर्व विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी निळया रंगाचे कपडे परिधान करून एखाद्या उत्सवाप्रमाणे ब्ल्यू डे उत्साहाने शाळेत साजरा केला.