Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

शिक्षकांसाठीची नाट्य कार्यशाळा उत्साहात संपन्न

by Divya Jalgaon Team
July 24, 2022
in जळगाव, शैक्षणिक
0
शिक्षकांसाठीची नाट्य कार्यशाळा उत्साहात संपन्न

जळगाव – विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांचा विकास व्हावा या उद्देशाने त्यांचा शैक्षणिक पाया घडविणाऱ्या प्राथमिक शिक्षकांमध्ये बालकांचे कलागुण विकसित करण्याचे सामर्थ्य यावे यासाठी राज्यात प्रथमच बालरंगभूमी परिषद जळगाव शाखा व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली ही कार्यशाळा निश्चितच उद्याचे यशस्वी कलावंत घडवेल, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी केले. मूळजी जेठा महाविद्यालयाच्या कॉन्फरन्स हॉलमधील शिक्षकांसाठीच्या नाट्य कार्यशाळा उद्‌घाटन प्रसंगी उद्‌घाटक म्हणून ते बोलत होते.

यावेळी बोलतांना ते पुढे म्हणाले की, बालकांतील अभिनय, नृत्य, संगीत या गुणांचा विकास त्यांच्या व्यक्तिमत्व घडविण्यासाठी आधारभूत ठरणारे गुण आहेत. ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाला शैक्षणिक पैलू पाडतांना त्यांचा आयक्यू वाढवित असतांना त्यांच्या इक्यू म्हणजे इमोशन कोशंट वाढविण्यासाठी या कला सहाय्यभूत ठरत असतात. आज या कार्यशाळेच्या माध्यमातून रचल्या गेलेल्या पायावर निश्चितच जळगावातील बालकलावंत पुढे जाऊन यशस्वी कलावंत ठरतील, असा मला विश्वास आहे.

कार्यशाळेचे उद्‌घाटन दीपप्रज्वलन व स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त शाहीर विनोद ढगे व सहकाऱ्यांनी सादर केलेल्या महाराष्ट्र गीताने झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून केसीई संस्थेचे सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वडोदकर, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोषाध्यक्षा प्रा.डॉ.शमा सराफ, ज्येष्ठ रंगकर्मी चिंतामण पाटील, महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अजित चौधरी, बालरंगभूमी परिषद जळगावचे अध्यक्ष योगेश शुक्ल, प्रमुख कार्यवाह विनोद ढगे, कार्यशाळेचे वक्ते शिक्षणतज्ज्ञ चंद्रकांत भंडारी, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे सदस्य संदीप घोरपडे (अमळनेर) आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यशाळेच्या उद्‌घाटनानंतर नाट्यरंग थिएटर्स, जळगाव निर्मित अमोल ठाकूर लिखीत – दिग्दर्शित पुस्तक एके पुस्तक या बालनाट्याचा प्रयोग करण्यात आला. मुलांच्या मनात असलेली वेगवेगळ्या विषयांची भीती, मिळणारे कमी गुण, अधिक गुणांसाठी असलेला पालकांचा आग्रह या विषयावर हसत खेळत भाष्य करणाऱ्या या आगळ्या वेगळ्या बालनाट्याच्या प्रयोगाला उपस्थित शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. या बालनाट्यात संस्कृती पवनीकर, मयंक ठाकूर, अंशा चव्हाण, शर्वा जोशी ,नेहा वंदना सुनिल, कृतिका कोरे, केतकी कोरे, कृष्णा पाटील, विकास वाघ, चंद्रकांत चौधरी, अमोल ठाकूर, अथर्व रंधे हे बालकलावंत तर तांत्रिक बाजू प्रकाश योजना – स्वप्निल गायकवाड, रंगभूषा व वेशभूषा – दिशा ठाकूर, पार्श्वसंगीत – दर्शन गुजराती, धनश्री जोशी, रंगमंच व्यवस्था – राहुल वंदना सुनील, ज्ञानेश्वर वाघ, सचिन महाजन, दीपक महाजन, रोहन चव्हाण यांनी सांभाळल्या होत्या.

Share post
Tags: #All India Marathi Theater Council#Children's Theater Council#Social activities#नाट्य कार्यशाळा#महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक महासंघ
Previous Post

निशुल्क नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर हिंगोणा येथे संपन्न

Next Post

12 वी निकालात आत्मन अशोक जैन अनुभूती निवासी स्कूलमध्ये द्वितीय विज्ञान शाखेतून प्रथम

Next Post
12 वी निकालात  आत्मन अशोक जैन  अनुभूती निवासी स्कूलमध्ये द्वितीय  विज्ञान शाखेतून प्रथम

12 वी निकालात आत्मन अशोक जैन अनुभूती निवासी स्कूलमध्ये द्वितीय विज्ञान शाखेतून प्रथम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group